सामाजिक

धामणी (ता.आंबेगाव) येथे हिंदुहृदयसम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांची जयंती संपन्न !!

img 20260123 wa0445

पंचनामा लोणी (धामणी) प्रतिनिधी – आंबेगाव तालुक्यातील धामणी गावात वंदनीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची जयंती मोठ्या उत्साहात ग्रामपंचायत समोरील पंचांच्या पारावर संपन्न करण्यात आली. याप्रसंगी बहुसंख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.

वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेचे पूजन मा.चेअरमन निवृत्तीशेठ मिंडे, बाजीराव भूमकर यांच्या शुभहस्ते करण्यात आले.

याप्रसंगी धामणी गावचे सरपंच अक्षय राजे विधाटे यांनी बोलताना सांगितले की,बाळासाहेब ठाकरे यांची ओळख त्यांच्या स्पष्टवक्तेपणा, निर्भीड भूमिका आणि मराठी माणसाच्या हक्कासाठी उभ्या ठाकलेल्या नेतृत्वामुळे होती. त्यांनी कधीही शब्द फिरवले नाहीत. जे वाटलं ते थेट मांडलं.त्यामुळेच त्यांचे विचार आजही तरुणाईला, सामान्य माणसाला आणि समाजाला दिशा देतात. हिंदुत्व, स्वाभिमान, अन्यायाविरोधातील संघर्ष आणि सत्तेपेक्षा तत्वांना महत्त्व ही त्यांच्या विचारांची मूळ सूत्रे होती.शिवसेना हा फक्त एक पक्ष नाही तर मंत्र आहे.

img 20260123 wa0445

उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाचे उपतालुकाप्रमुख महेश वाघ यांनी बोलताना सांगितले की,शिवसेनेच्या या ४ अक्षरावर प्रेम करणारे अनेक शिवसैनिक आजही आहेत.बाळासाहेब ठाकरे यांच्यामुळे सर्वसामान्य कुटुंबातील माणूस आमदार, खासदार,मंत्री आणि मुख्यमंत्री पदापर्यंत जाऊ शकला ही ताकद बाळासाहेब ठाकरे यांची होती.

या प्रसंगी मा.चेअरमन कोंडीभाऊ तांबे, मा. सरपंच सागर जाधव,मा. उपसरपंच महेश भुमकर, रुपेश विधाटे, वसंत भुमकर, अमोल जाधव, मनेश जाधव, रोहित भुमकर, शांताराम चौधरी, दिलीप पंचरास, स्वप्नील बढेकर,लालु जाधव, पप्पु देशमुख, दशरथ घोलप, चंद्रकांत जाधव आणि बहुसंख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.

Related posts

वाबळेवाडी शाळेच्या स्वरूप भागवतची अमेरिकेतील नासा स्पेस सेंटरला महत्त्वपूर्ण भेट !!

Chief Editor

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जारकरवाडीच्या शिरपेचात मनाचा तुरा!!

Chief Editor

समर्थ कॉलेज ऑफ कॉम्प्युटर सायन्स, बेल्हे येथे ‘नशामुक्त युवा अभियान’ उत्साहात संपन्न !!

Chief Editor

Leave a Comment