सामाजिक

न्यू इंग्लिश स्कूल लाखणगावच्या १३ विद्यार्थिनींना सायकलचे वाटप !!

img 20260227 wa0408
img 20260227 wa0408

पंचनामा लोणी (धामणी) प्रतिनिधी – सेंटर फॉर ट्रान्सफॉर्मिंग इंडिया, मुंबई व ॲटलास कार्पो ग्रुप, स्वीडन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित खेड तालुक्यातील पंढरी लॉन्स, कडूस येथे झालेल्या कार्यक्रमात न्यू इंग्लिश स्कूल लाखणगाव च्या इ. ८ वी च्या १३ विद्यार्थिनीना शाळेतील सायकल बँकसाठी १३ सायकल मोफत मिळाल्या आहेत.

कार्यक्रमाच्या निमित्ताने शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष नवनाथ गाडगे,उपाध्यक्ष प्रदीप रोडे पाटील, १३ विद्यार्थिनी, उपशिक्षिका कल्पना राजगुरु , मुख्याध्यापक अनिल देसले, मनोज पाटील यांनी सायकल स्वीकारल्यात.

यावेळी सीएफटीआयचे प्रमुख श्री.देशपांडे यांनी विद्यार्थिनींना शाळेत येण्या-जाण्यासाठी पुढील काळात अजून भरीव मदत करणार असे आश्वासन दिले तथा शाळेतील विद्यार्थिनींसाठी पुढील काळात अजून सायकल देऊ असे ॲटलास कार्पोचे अधिकारी यांनी नमूद केले. शाळेत सुमारे सात ते आठ फाउंडेशन संलग्न करून विद्यार्थ्यांना नवीन नवीन शैक्षणिक सुविधा उभारत आहोत. यात पुन्हा एक सीएफटीआय फाउंडेशन ची भर पडली व पुढील काळात अजून विद्यार्थ्यांसाठी अत्याधुनिक सुविधा निर्माण करू असे मुख्याध्यापक अनिल देसले यांनी नमूद केले.

fb img 1771121541695

Related posts

अजमेळा दिंडीचे कार्य कौतुकास्पद:- सौ.तृप्ती ताई राजेंद्र खरे यांचे प्रतिपादन !!

Chief Editor

राष्ट्रीय क्विझ स्पर्धेत “समर्थ फार्मसी” च्या रुचा कोरडेचे नेत्रदीपक यश२०० विद्यार्थ्यांवर मात करत पटकावले विजेतेपद; २५ पैकी २५ गुणांची कमाई, अवघ्या ४ मिनिटे १५ सेकंदांत प्रश्नमंजुषा पूर्ण !!

Chief Editor

देशातील ७५ आणि महाराष्ट्रातील दोन अमृत रेल्वे स्थानकांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण

Chief Editor

Leave a Comment