सामाजिक

जांभोरीत ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा; स्वातंत्र्यवीरांना अभिवादन !!

1010592213

पंचनामा प्रतिनिधी – आंबेगाव तालुक्यातील जांभोरी येथे शनिवार, दि. १५ ऑगस्ट रोजी भारताचा ८० वा स्वातंत्र्य दिन विविध उपक्रमांनी व उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला.

ग्रामपंचायत कार्यालयात भारतमाता व क्रांतिकारकांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर ग्रामपंचायत कार्यालयात सरपंच सुनंदा पारधी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.

img 20260816 wa0355

प्राथमिक आरोग्य उपकेंद्र येथे खरेदी-विक्री संघाचे उपाध्यक्ष शामराव बांबळे, तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष नामदेव भोकटे व माजी सैनिक मुरलीधर केंगले यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. रयत शिक्षण संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूलमध्ये ग्रामपंचायत सदस्य शिवराम दादा केंगले यांच्या हस्ते, तर जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जांभोरी येथे शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष दत्ता भोकटे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.

यावेळी जांभोरी गावचे भूषण व पहिले आदिवासी समाजाचे पंचायत समिती सभापती स्वर्गीय शंकर विठू केंगले यांच्या स्मारकाचे पूजन करण्यात आले. सरपंच सुनंदा पारधी, ग्रामपंचायत सदस्य लताबाई केंगले, शिवराम केंगले, दूंदा भोकटे, पोलीस पाटील सोनाली पोटे, पोलीस पाटील नवनाथ केंगले, शामराव बांबळे, राष्ट्रवादी काँग्रेसचे पश्चिम विभागाचे युवानेते मारुती दादा केंगले, माजी सैनिक मुरलीधर केंगले, पेसा अध्यक्ष दत्ता गिरंगे, मीना केंगले, सागर काठे यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते.
तसेच जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक संदीप माळी, न्यू इंग्लिश स्कूलचे मुख्याध्यापक काळू केंगले, शिक्षकवृंद, आरोग्य कर्मचारी जनाबाई बागुल, आरोग्य सेविका, अंगणवाडी सेविका, मदतनीस, आशा वर्कर तसेच जांभोरी गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

1010592218

स्वातंत्र्य दिनानिमित्त गावातील विविध शासकीय, शैक्षणिक व सामाजिक संस्थांमध्ये देशभक्तीमय वातावरण निर्माण झाले होते. राष्ट्रध्वजाला मानवंदना देत स्वातंत्र्यसैनिकांच्या त्यागाचे स्मरण करण्यात आले.

1010592219
1010543616
1010480394

Related posts

रांजणी (ता.आंबेगाव) गावातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा कांदा चालला दुबईला !!

Chief Editor

असे तमाशाफड,असे तमाशा व्यवस्थापक – मा.राजेंद्र छगन काशीद

Chief Editor

इम्पॅक्ट पंचनामाच्या बातमीचा – पारगाव शिंगवे) येथील घोडनदी परिसरातील विजेचे खांब झाले दुरुस्त !!

Chief Editor

Leave a Comment