सामाजिक

केंद्र सरकारच्या उत्कृष्ट सेवा पदकाने API चंद्रकांत लोहकरे यांचा गौरव !!

1010592324


जांभोरी (नांदूरकीचीवाडी) : जांभोरी (नांदूरकीचीवाडी) गावचे सुपुत्र तथा पुणे शहर पोलीस दलात सहाय्यक पोलीस निरीक्षक म्हणून कार्यरत असलेले चंद्रकांत शांताराम लोहकरे यांनी महाराष्ट्र पोलीस दलात निष्कलंक व उत्कृष्ट सेवा बजावल्याबद्दल केंद्र सरकारचे ‘उत्कृष्ट सेवा पदक’ जाहीर झाले आहे. या उल्लेखनीय कामगिरीबद्दल जांभोरी परिसरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
चंद्रकांत लोहकरे यांच्या या यशाबद्दल महाराष्ट्र राज्याचे माजी गृहमंत्री दिलीपराव वळसे पाटील, म्हाडाचे सभापती तथा माजी खासदार शिवाजीदादा आढळराव पाटील, शिरूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. अमोल कोल्हे, पुणे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष विवेकदादा वळसे पाटील, शिनोली जिल्हा परिषद सदस्या शिलाताई लोहकरे आदी मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
यावेळी पंचायत समिती सभापती कैलासबुवा काळे, उपसभापती ज्योती पारधी, युवानेते प्रविण पारधी, किसन गिरंगे, हेमंत केंगले, राज केंगले (सिव्हिल इंजिनिअर), नगरसेवक लखनदादा पारधी, जांभोरी गावच्या लोकनियुक्त सरपंच सुनंदा पारधी, उपसरपंच बबन केंगले, खरेदी-विक्री संघाचे उपाध्यक्ष शामराव बांबळे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पश्चिम विभागाचे युवानेते मारुतीदादा केंगले, पोलीस पाटील सोनाली पोटे, नवनाथ केंगले यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.
तसेच जांभोरी ग्रामविकास फाऊंडेशनचे अध्यक्ष पुनाजी पारधी, उपाध्यक्ष दिलीपराव गिरंगे व सर्व संचालक मंडळ, जांभोरी ग्रामविकास प्रतिष्ठान नांदूरकीचीवाडीचे अध्यक्ष अंकुश केंगले, उपाध्यक्ष लक्ष्मण केंगले तसेच संचालक मंडळातील शरद बांबळे, विलासराव केंगले, प्रमोद केंगले, सुभाष लोहकरे, मोहन लोहकरे, गणेश केंगले, अंकुश गिरंगे यांच्यासह जांभोरी ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच, सर्व सदस्य व ग्रामस्थांनी चंद्रकांत लोहकरे यांचे अभिनंदन केले.
पोलीस दलातील प्रदीर्घ, निष्कलंक आणि उत्कृष्ट सेवेला मिळालेली ही राष्ट्रीय स्तरावरील दखल जांभोरी गावासाठी अभिमानाची बाब असून, त्यांच्या पुढील सेवावाटचालीस ग्रामस्थांनी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.

1010543616
1010480394

Related posts

शिंगवे (पारगाव) येथे अल्पवयीन मुलीवरील अत्याचाराच्या घटनेच्या निषेधार्थ गाव बंद; जनआक्रोश मोर्चा

Chief Editor

समर्थ कॉलेज ऑफ कॉम्प्युटर सायन्स, बेल्हे येथे ‘नशामुक्त युवा अभियान’ उत्साहात संपन्न !!

Chief Editor

आळंदीमध्ये इंद्रायणी नदीने धोक्याची पातळी ओलांडली !!

Chief Editor

Leave a Comment