सामाजिक

नाते कलेचे माझ्या रक्ताशी – कै. संध्याताई रमेश माने

1010597378

परमेश्वराने प्रत्येक माणसाला वेगवेगळी, कला अवगत करून दिलेली आहे. त्यातीलच हा एक,कलेचा प्रकार कला अवगत करून घेण्यासाठी, संपूर्ण आयुष्य खर्च करावे लागते हे अगदी नक्की !!

कै. संध्याताई रमेश माने. यांचा जन्म सुवर्ण राष्ट्रपती पदक विजेत्या विठाबाई भाऊ मांग नारायणगावकर यांच्या पोटी दिनांक 5/4 /1957 रोजी पुणे येथे झाला.

त्यांना दोन मुले ,एक मुलगी आणि सहा नातू आहेत. तमाशा सम्राज्ञी विठाबाई भाऊ मांग नारायणगावकर यांच्या सर्व मुली आणि मुले व नातवंडे ही तमाश कलेसाठी या भारतभूमीमधे जन्माला आली,कलेचे योगदान देण्यासाठीच !! तमाशाचा इतिहास या कुटुंबाशिवाय पूर्ण होणार नाही हे अगदी नक्कीच !!

हे कुटुंब म्हणजे कलेसाठी योगदान देणारी एक स्वर्ण खाणच आहे याचा रसिकांना स्वाभिमान आहे.कला तेजस्वी संध्या माने यांचे समयी नृत्य माणसाला मोहित करणारे होते.रंगभूमीवर चपळ नृत्य करणे हे सोपे नाही.शिवाय त्यांची थाळी नृत्य हे रसिकांच्या डोळ्याचे पारणे फेडणारे होते. त्यांचे शिक्षण जास्त झालेले नव्हते परंतु एवढ्या कमी शिक्षणात त्यांनी खुप कला अवगत करून घेतली. वयाच्या दहाव्या वर्षापासूनच रंगमंचकाचे दर्शन लाभले. आणि रंग देवता प्रसन्न झाली.

त्यांची राहणी साधी असून स्वभाव प्रेमळ होता. त्या रंगमंचकावर येताच रसिक टाळ्यांच्या गजरात व शिट्ट्यांच्या आवाजात त्यांचे स्वागत करीत होते. अतिशय प्रेमळ स्वभाव, कलाकारांची जाणीव आणि आईचा वारसा हे सर्व गुण तिच्या अंगी होते एवढेच नाही कै.विठाबाईंनी अवघ्या नऊ ते दहा वर्षाचतच संध्याताईच्या पायात स्वतःच्या हाताने चाळ बांधले.

सन 1974 मध्ये संध्या ताईंना पूर्ण अठरा वर्षे झाली होती.आता संध्याताई कलाक्षेत्रात अतिशय तयार झाल्या होत्या. आईचा आशीर्वाद घेऊन त्या आता थाळी डान्स,समयी डान्स, गुडघे नृत्य आणि पेटती मशाल घेऊन आपले नाव महाराष्ट्र मध्ये गाजवले.

त्यांनी संध्या माने सोलापूरकर या नावाने तमाशा फड ओपन केला होता.त्यांची मुंबईची केळेवाली, हुंड्याला कायदा आहे का ? रक्ताने रंगली कुऱ्हाड,पुढारी गरिबाला जगू द्या,मराठी सरदार इत्यादी वगनाट्याने रसिकांना प्रबोधन केले.त्यांनी व्यसनमुक्ती या विषयावर भरपूर जोर दिला.

त्यांच्या जीवनामध्ये अनेक अडीअडचणी आल्या परंतु त्यांनी धीर सोडला नाही. आपले कलेचे कार्य करीतच राहिल्या.एक वेळेस त्यांचा अपघात झाला पायाला मोठी जखम झाली. पण आपल्या कलेला विसर पडू दिला नाही.कला हेच माझे जीवन आहे असे समजून तमाशाची रंगभूमी कधी सोडलीच नाही. पेटती समयी डोक्यावर घेऊन नृत्य करणे म्हणजे सोपे नाही. त्यांचे नृत्य म्हणजे माणसाच्या काळजाला भिडणारी एक तलवारच होती. त्यांचा आवाज, नाचण्याचा ठेका. बोलण्याची पद्धत, कला सादर करण्याची आवड, ही काही वेगळीच !!

विठाबाईंच्या तमाशाची आठवण – एकदा तमाशा फड नारायणगावी आला.आईच्या सांगण्यावरून थाळी नृत्य करायला लागली परातीचे काठ पायाला रक्तबंबाळ करून ,तिचा जीव कासा विस होता.डोक्यावर पेटती समयी होती प्रेक्षकांच्या टाळ्यांचा आणि शिट्ट्यांचा गजर चालूच होता. संपूर्ण तमाशा वर पाणी टाकणारा हाच समयी डान्स त्यांचा मुख्य ठरला.

रसिकांच्या शाब्बासकीची थाप ,हीच त्यांच्या कलेची पावती ठरली.संध्याताईने राणीबाग ठाणे भिवंडी आणि महाराष्ट्रातील जत्रा, यात्रा या ठिकाणी जाऊन रसिकांच्या गर्दीचा पारा चढतच गेला. तमाशा रंगभूमीवर आपले नाव मोठे करून, महाराष्ट्र शासनाचा जीवनगौरव पुरस्कार त्यांनी पटकावला.

संध्या ताईने थाळी नृत्याने आणि पेटती मशाल डोक्यावर घेऊन, संपूर्ण महाराष्ट्राच्या काण्या, कोपऱ्यात आपले नाव रसिकांच्या ओठावर ठेवले ,खरंच…. अशे अष्टपैलू कलावंत पुन्हा जन्माला कधी येथील कोण जाणे.

पण शेवटी मरण कुणालाही चुकलेच नाही.दिनांक 4/3/2025 रोजी त्यांच्यावर काळाने झडप घातली. आणि संध्या माने या जगाचा हा मायारूपी, पिंजरा सोडून परलोकी निघून गेल्या.

अशा या महान कलावंतास शतशः कोटी कोटी प्रणाम …….कै .संध्या माने हे नाव चंद्र, सूर्य असेपर्यंत रसिकांच्या ओठावर राहील यात शंकाच नाही.कै.संध्याताई, सारखे कलावंत या महाराष्ट्राच्या मातीत पुन्हा जन्माला यावेत…. अशी जगदंबे मातेच्या चरणी प्रार्थना !!

लेखक – शाहीर खंदारे (नेवासा)
8605558432

1010560300
1010457105

Related posts

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६

Chief Editor

धामणीत अक्षयतृतीयेला खंडेरायाला चंदनउटी लेपन !!

Chief Editor

शिरदाळे (ता.आंबेगाव) येथे राबविला गेला अनोखा अन अभिमानास्पद सोहळा !!

Chief Editor

Leave a Comment