सामाजिक

रानमळा (ता.आंबेगाव ) येथे धर्मनाथ महाराजांच्या (बीज) यात्रेनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम संपन्न!!

img 20260122 wa0880

पंचनामा लोणी (धामणी) प्रतिनिधी – रानमळा (ता.आंबेगाव ) येथील धर्मनाथ महाराजांच्या (बीज) यात्रेनिमित विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

बिजेच्या दिवशी सायंकाळी सातच्या नंतर महिलांनी ठमाचा (गव्हाच्या कणकेपासून बनविलेला ) दिवा डोक्यावर घेऊन गावातून मिरवणूक काढण्यात आली. यावेळी असंख्य दिव्यांच्या ज्योतीच्या प्रकाशाने रानमळा गाव उजाळून निघाले होते.

धर्मनाथ महाराजाच्या यात्रेच्या पहिल्या दिवशी गावातील प्रत्येक कुटुंबातील महिलेने पेटविलेल्या ठमाचा दिवा डोक्यावर घेऊन गावातून मिरवणूक काढली.यावेळी मिरवणूकीच्या अग्रभागी ग्रामस्थांचे पारंपारिक ढोल लेझीम व पारंपारिक वाद्य पथक होते.मिरवणूकीमध्ये परिसरातील नागरिकांनी सहभाग घेतला होता.यावेळी धर्मनाथ महाराज बीजेनिमित्त देवास अंबिल,मलिदा,ज्वारीच्या घुगर्या व भाजीचा नैवेद्य देवाला भावपूर्ण अर्पण करण्यात आला.

fb img 1768108641525

यात्रेनिमित्त धर्मनाथ महाराजांच्या मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती.याबाबत सरपंच राजू सिनलकर,पोलिस पाटील रूपेश सिनलकर, संतोष सिनलकर,अशोक सिनलकर,भास्कर सिनलकर, सचिन सिनलकर,सुमित सिनलकर, जालिंधर सिनलकर, बबन सिनलकर व ग्रामस्थांनी माहिती दिली.

Related posts

पोंदेवाडी (ता.आंबेगाव) येथील ट्रांसफार्मर गेला चोरीला !!

Chief Editor

आपलं असणं आणि आपलं हसणं हे आपणचं जपलं पाहीजे”

Chief Editor

वारकऱ्याच्या मदतीला धावले पुणे वाहतूक पोलिसांचे डीसीपी; प्रसंगावधानाने वाचवले प्राण !!

Chief Editor

Leave a Comment