
पंचनामा प्रतिनिधी – गिरवली (ता. आंबेगाव) येथील रहिवासी तनुजा पिंगळे-हगवणे यांना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या आंतरविद्या अभ्यास शाखेअंतर्गत शिक्षणशास्त्र विषयात पीएच.डी. पदवी जाहीर झाली आहे.
उच्च प्राथमिक स्तरावरील बालगृहातील बालकांच्या भावनिक विकासासाठी कृती कार्यक्रमाची निर्मिती व परिणामकारकतेचा ‘उच्च प्राथमिक स्तरावरील बालगृहातील बालकांच्या भावनिक विकासासाठी कृती कार्यक्रमाची निर्मिती व परिणामकारकतेचा अभ्यास’ या विषयावर त्यांनी संशोधन प्रबंध सादर केला.
या संशोधनासाठी त्यांना डॉ.शिवाजी देसाई यांचे मार्गदर्शन लाभले. या संशोधन प्रवासात त्यांना आई, राष्ट्रपती पुरस्कार विजेत्या सेवानिवृत्त केंद्रप्रमुख इंदुमती पिंगळे, पती माजी सभापती पवन हगवणे व मुली जाई जुई यांनी प्रोत्साहन दिले .



