सामाजिक

समर्थ ज्युनिअर कॉलेज, बेल्हेचा एम.एच.टी.-सीईटी २०२६ मध्ये यश !!

1009855898

पंचनामा प्रतिनिधी – ज्ञान, गुणवत्ता आणि यश यांचा त्रिवेणी संगम असलेल्या समर्थ रुरल एज्युकेशनल इन्स्टिट्यूट संचलित समर्थ ज्युनिअर कॉलेज, बेल्हे (बांगरवाडी) येथील विद्यार्थ्यांनी एम.एच.टी.-सीईटी २०२६ परीक्षेत उज्ज्वल यश संपादन करून संस्थेच्या शैक्षणिक परंपरेत आणखी एक मानाचा तुरा खोवला आहे. विद्यार्थ्यांच्या या नेत्रदीपक कामगिरीमुळे परिसरात आनंदाचे व अभिमानाचे वातावरण निर्माण झाले असून, संस्थेच्या गुणवत्तापूर्ण शिक्षणाची पुन्हा एकदा प्रचिती आली आहे.

पीसीबी गटामध्ये विद्यार्थिनी कु.रिद्धी थिटे हिने ९७.५४ पर्सेंटाईल मिळवून महाविद्यालयात प्रथम क्रमांक पटकावला. तिच्या यशाने समर्थच्या शैक्षणिक गुणवत्तेचा झेंडा उंचावला आहे. याशिवाय वैष्णवी येवले (९५.८०), दिव्या औटी (९३.५५), आयुष वाघुले (९३.१७), ईश्वरी दाते (९२.३५), श्रुती शिंदे (९२.०७) यांच्यासह अनेक विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश संपादन केले. तब्बल अनेक विद्यार्थ्यांनी ८० पेक्षा अधिक पर्सेंटाईल मिळवत यशाची उज्ज्वल परंपरा कायम राखल्याची माहिती प्राचार्या वैशालीताई आहेर यांनी दिली.

पीसीएम गटामध्ये दिव्या औटी हिने ९५.०९ पर्सेंटाईल मिळवत विशेष कामगिरीची नोंद केली. तसेच दत्तात्रय पानमंद (८९.५१), आयुष वाघुले (८७.९६), दीपक पारधी (८७.४०), गणेश परंडवाल (८५.८१), ज्ञानेश्वरी जाधव (८५.८१) यांच्यासह अनेक विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट यश संपादन करत आपल्या कर्तृत्वाची छाप उमटविली.

याचबरोबर समर्थ गुरुकुलच्या विद्यार्थ्यांनीही यशाचा नवा अध्याय लिहिला. समर्थ विवेक शेळके यांनी बीबीए-सीईटीमध्ये ९६.८१ टक्के, तर कु. श्वेता संदीप मटाले यांनी पीसीबी गटात ९२.६० टक्के गुण मिळवून संस्थेचा नावलौकिक अधिक उंचावला. तसेच श्वेता बांगार (८५.५०), सार्थक गाडगे (८३.८९) आणि स्नेहा रोकडे (७९.५४) यांनीही उल्लेखनीय यश संपादन केल्याची माहिती समर्थ गुरुकुल ची प्राचार्य सतीश कुऱ्हे यांनी दिली.

विद्यार्थ्यांच्या या यशामागे त्यांची अथक मेहनत, शिक्षकांचे सातत्यपूर्ण मार्गदर्शन आणि संस्थेचे दूरदृष्टीपूर्ण शैक्षणिक धोरण यांचा मोठा वाटा असल्याची भावना व्यक्त करण्यात आली. या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष वसंतराव शेळके, उपाध्यक्ष माऊली शेठ शेळके, सचिव विवेक शेळके, विश्वस्त वल्लभ शेळके, मा. जिल्हा परिषद सदस्या स्नेहलताई शेळके, कॅम्पस डायरेक्टर प्रा. राजीव सावंत, प्रशासकीय अधिकारी प्रा. प्रदीप गाडेकर तसेच संकुलातील सर्व विभागांचे प्राचार्य, विभागप्रमुख, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून त्यांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी शुभेच्छांचा वर्षाव केला.

“मेहनत, गुणवत्ता आणि योग्य मार्गदर्शन यांची सांगड घातली तर यश निश्चितच मिळते,” हे समर्थच्या विद्यार्थ्यांनी आपल्या कर्तृत्वातून पुन्हा एकदा सिद्ध करून दाखविले आहे. एम.एच.टी.-सीईटी २०२६ मधील हे यश समर्थ संस्थेच्या शैक्षणिक वाटचालीतील आणखी एक सुवर्णपान ठरले आहे.

1009850407
1009828026
1009850522

Related posts

उन्हाच्या झळा झाल्या तीव्र; आठवडे बाजारात ग्राहकांचा शुकशुकाट !!

Chief Editor

पंचनामा विचारधन – कन्यादान

Chief Editor

पंडित जवाहरलाल नेहरू माध्यमिक व दत्तात्रय गोविंदराव वळसे पाटील उच्च माध्यमिक विद्यालयात गुरु पौर्णिमा उत्साहात साजरी !!

Chief Editor

Leave a Comment