सामाजिक

जारकरवाडी गावच्या शिरपेचात मानाचा तुरा;सुरेश काशिनाथ खुडे यांना ‘राष्ट्रीय भारत गौरव पुरस्कार ;कला व सामाजिक क्षेत्रातील योगदानाची दखल; ‘महाराष्ट्राच्या कला व संस्कृतीचे पालक’ म्हणून गौरव !!

1010508189
1010508189

पंचनामा प्रतिनिधी- कला, संस्कृती आणि सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणारे श्री. सुरेश काशिनाथ खुडे यांना राष्ट्रीय भारत गौरव पुरस्कार२०२६ डफ (धुम) ह्या कलेच्या माध्यमातून राष्ट्रीय भारत गौरव पुरस्कार आंबेडकर भवन (पुणे) या ठिकाणी सन्मानित करण्यात आले .कला व सामाजिक कार्यातील त्यांच्या योगदानाची तसेच महाराष्ट्राच्या कला व संस्कृतीच्या जतन व संवर्धनासाठी केलेल्या कार्याची दखल घेत त्यांचा हा सन्मान करण्यात आला.पुरस्कारपत्रिकेनुसार, ‘National Bharat Gaurav Award 2026’ हा पुरस्कार सोहळा २०२६ मध्ये आयोजित करण्यात आला होता. या वेळी खुडे यांचा ‘Ideal Artist | Social Service | Guardian of Maharashtra’s Art & Culture’ या योगदानासाठी विशेष गौरव करण्यात आला.

त्यांच्या कलाक्षेत्रातील कार्यासोबतच सामाजिक बांधिलकी जपत केलेल्या विविध उपक्रमांची दखल या पुरस्काराच्या माध्यमातून घेण्यात आली.

सुरेश खुडे यांनी कला ही केवळ मनोरंजनाचे माध्यम न राहता समाजप्रबोधन, संस्कृतीचे जतन आणि नव्या पिढीला आपल्या परंपरांशी जोडण्याचे प्रभावी माध्यम ठरावे, यासाठी सातत्याने प्रयत्न केले आहेत. महाराष्ट्राच्या समृद्ध कला व सांस्कृतिक परंपरेचा वारसा पुढील पिढीपर्यंत पोहोचविण्यासाठी त्यांचे योगदान महत्त्वपूर्ण असल्याचे पुरस्कारपत्रिकेत नमूद करण्यात आले आहे.

1010508184

‘आपल्या समर्पित योगदानामुळे देशाच्या गौरवशाली इतिहासात एक प्रेरणादायी अध्याय निर्माण झाला असून, प्रामाणिकपणा, समर्पण आणि राष्ट्रीय अभिमानाची भावना पुढील पिढ्यांसाठी प्रेरणादायी ठरेल,’ अशा आशयातून पुरस्काराच्या माध्यमातून त्यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला.

या पुरस्काराचे आयोजन सौ. ज्योती सोशल ऑर्गनायझेशन, पुणे, श्लोक फाउंडेशन आणि एस. एच. मीडिया यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले. संस्थेचे संस्थापक व अध्यक्ष सचिन हळदे तसेच उपाध्यक्ष विकास उबाळे यांच्या उपस्थितीत हा गौरव करण्यात आल्याचे पुरस्कारपत्रिकेत नमूद आहे.

सुरेश खुडे यांना मिळालेल्या या सन्मानाबद्दल कला, सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रातील विविध मान्यवर, मित्रपरिवार तसेच नागरिकांकडून त्यांचे अभिनंदन होत आहे. कला आणि सामाजिक कार्याची सांगड घालत समाजासाठी योगदान देणाऱ्या व्यक्तिमत्त्वाचा राष्ट्रीय स्तरावर झालेला हा गौरव निश्चितच प्रेरणादायी ठरला आहे.

1010457105

Related posts

रील फॉर सॉईल ॲण्ड वॉटर कन्झर्वेशन’ स्पर्धेत सहभाग घ्यावा- चेतन कलशेट्टी ; २१ ऑगस्ट २०२६ पर्यंत जलसंधारण सप्ताह रील्स स्पर्धेचे आयोजन !!

Chief Editor

केंद्र सरकारच्या उत्कृष्ट सेवा पदकाने API चंद्रकांत लोहकरे यांचा गौरव !!

Chief Editor

गुरुकुलच्या विद्यार्थ्यांनी अनुभवले आधुनिक तंत्रज्ञानाचे प्रात्यक्षिक धडे !!

Chief Editor

Leave a Comment