सामाजिक

तंत्रज्ञानाच्या नव्या युगाशी विद्यार्थ्यांची ओळख; समर्थ पॉलीटेक्निकमध्ये इंडक्शन प्रोग्रामला उत्स्फूर्त सुरुवात !!

1010516121
1010516121


समर्थ रुरल एज्युकेशनल इन्स्टिट्यूट संचलित समर्थ पॉलीटेक्निक, बेल्हे येथे प्रथम वर्ष प्रवेशित विद्यार्थ्यांसाठी चार दिवसीय इंडक्शन प्रोग्रामचे आयोजन करण्यात आले असून, या कार्यक्रमाचा उद्घाटन सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी समर्थ पॉलीटेक्निकचे प्राचार्य डॉ. अनिल कपिले होते. यावेळी त्यांनी नव्याने प्रवेशित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना पॉलिटेक्निक शिक्षणाचे महत्त्व, तांत्रिक शिक्षणातून उपलब्ध होणाऱ्या विविध करिअर संधी तसेच विद्यार्थ्यांनी आपल्या आवडीच्या क्षेत्रात कौशल्य विकसित करण्याची गरज याविषयी मार्गदर्शन केले. “पॉलिटेक्निकचे शिक्षण हे केवळ पदविका मिळविण्यापुरते मर्यादित नसून उद्योगक्षेत्राच्या गरजा ओळखून कौशल्यपूर्ण करिअर घडविण्याची एक उत्तम संधी आहे,” असे त्यांनी सांगितले.
प्रथम वर्षात प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना महाविद्यालयीन वातावरणाशी परिचित करून देणे, तांत्रिक शिक्षणाची दिशा समजावून सांगणे, विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास व सकारात्मक दृष्टिकोन निर्माण करणे तसेच विविध कौशल्यांची ओळख करून देणे हा या इंडक्शन प्रोग्रामचा प्रमुख उद्देश आहे.
चार दिवसीय इंडक्शन प्रोग्राममध्ये विद्यार्थ्यांसाठी विविध उपयुक्त व आधुनिक विषयांवर तज्ज्ञांचे मार्गदर्शन आयोजित करण्यात आले आहे.
व्यक्तिमत्त्व विकास – श्री. ज्ञानेश्वर धोमरे
ड्रोन तंत्रज्ञान – श्री. नितीन सोनावणे
सायबर सुरक्षा आणि कृत्रिम बुद्धिमत्ता – श्री. प्रथमेष थोरात
ॲडिटिव्ह मॅन्युफॅक्चरिंग आणि त्रिमितीय मुद्रण (3D प्रिंटिंग) – श्री. सचिन शेलके
रोबोटिक्स – डॉ. रमेश पवार
या विविध सत्रांमधून विद्यार्थ्यांना व्यक्तिमत्त्व विकासासोबतच ड्रोन तंत्रज्ञान, कृत्रिम बुद्धिमत्ता, सायबर सुरक्षा, थ्री-डी प्रिंटिंग, ॲडिटिव्ह मॅन्युफॅक्चरिंग आणि रोबोटिक्स यांसारख्या आधुनिक तंत्रज्ञानाची ओळख करून देण्यात येणार आहे.
कार्यक्रमासाठी उपप्राचार्य प्रा. संजय कंधारे तसेच इंडक्शन प्रोग्रामचे समन्वयक प्रा. शाम फुलपगारे यांच्यासह महाविद्यालयातील प्राध्यापक व कर्मचारी उपस्थित होते.
या कार्यक्रमासाठी संस्थेचे अध्यक्ष वसंतराव शेळके, उपाध्यक्ष माऊलीशेठ शेळके, सचिव विवेक शेळके, विश्वस्त वल्लभ शेळके, माजी जिल्हा परिषद सदस्य स्नेहलताई शेळके, कॅम्पस डायरेक्टर राजीव सावंत तसेच प्रशासकीय अधिकारी प्रा. प्रदीप गाडेकर यांनी शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. ईश्वर कोरडे यांनी केले, तर उपस्थित मान्यवरांचे आभार प्रा. शाम फुलपगारे यांनी मानले.
नवीन विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रवासाची सकारात्मक आणि प्रेरणादायी सुरुवात व्हावी, तसेच बदलत्या तंत्रज्ञानाच्या युगात आवश्यक कौशल्ये आत्मसात करण्याची दिशा विद्यार्थ्यांना मिळावी, या उद्देशाने आयोजित करण्यात आलेला हा इंडक्शन प्रोग्राम विद्यार्थ्यांसाठी निश्चितच मार्गदर्शक व उपयुक्त ठरणार आहे.

1010489686

Related posts

लेखक व शाहीर राजा पाटील (कवठे महांकाळकर) उर्फ बाप्पू !

Chief Editor

तीन पिढ्यांचा एकत्रित रक्षाबंधन सोहळा उत्साहात !!

Chief Editor

क्वांटम तंत्रज्ञानात महाराष्ट्राला देशात अग्रस्थानी नेण्याचे उद्दिष्ट– मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Chief Editor

Leave a Comment