सामाजिक

लोणी वाफगाव घाटात अती पावसाने झाडे आणि मातीचा मलबा कोसळला !!

1010100267
1010100267

पंचनामा प्रतिनिधी – गेल्या पाच सहा दिवसांपासून पुणे जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसाचा फटका सर्वदूर बसताना पाहायला मिळत आहे.आंबेगाव तालुक्यातून खेड तालुक्याला जोडणारा महत्वाचा रस्ता असलेला लोणी वाफगाव रस्त्यात शिकोजीबाबा घाटात आज सकाळी अतिवृष्टीमुळे दरड सदृश भाग कोसळून रस्त्यात मलबा वाहून आला आहे.तसेच अनेक झाडे उन्मळून पडलेली आहेत.त्यामुळे खूप मोठा धोका निर्माण झाला आहे.

1010100242
1010100240

सदरची घटना शिरदाळे गावातील युवक आदिनाथ तांबे हे अभ्यासाच्या निमित्याने लोणी या ठिकाणी जात असताना त्यांच्या निदर्शनास आली.त्यांनी तातडीने सदर घटनेची माहिती शिरदाळे गावचे मा.उपसरपंच मयुर सरडे यांना कळवली तसेच त्या ठिकाणची परिस्थिती सांगितली.त्यांनी देखील त्वरित PWD अधिकारी श्री.लोंढे साहेब यांना संपर्क करून घटनेची माहिती दिली.त्यांनी देखील तातडीने दखल घेत त्याठिकाणी JCB तसेच इतर साहित्य उपलब्द करून सदरचा रस्ता वाहतुकीसाठी खुला केला जाईल असे सांगितले.त्यानुसार पुढील एक तासातच त्याठिकाणी रस्ता वाहतुकीसाठी व्यवस्थित करण्यात आला.परंतु पाऊस अधिकचा सुरू असून अजून देखील मोठ्या प्रमाणावर अशा दुर्घटना घडू शकतात.त्यामुळे नागरिकांनी अशा धोक्याच्या ठिकाणावरून प्रवास टाळण्याचे आवाहन यावेळी श्री.लोंढे यांनी केले आहे.

Related posts

तमाशा फड मालक,अष्टपैलू कलावंत अमन तांबे यांचे निधन

Chief Editor

पंचनामा विचारधन – पाणकळा

Chief Editor

पालखी सोहळ्यातील वाहनांची तांत्रिक तपासणी करुन घेण्याचे आवाहन !!

Chief Editor

Leave a Comment