सामाजिक

आदर्श माध्यमिक विद्यालय जारकरवाडी येथे ब्रह्मकुमारी विश्वविद्यालय शाखा पारगाव यांच्या माध्यमातून व्यसनमुक्ती,मोबाईलच्या अतिवापरासह व्यसनांच्या दुष्परिणामांबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन !!

1010516953
1010516953

पंचनामा प्रतिनिधी – राष्ट्रीय ग्रामीण विकास केंद्र संचलित आदर्श माध्यमिक विद्यालय व जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या संयुक्त विद्यमाने प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय, शाखा पारगाव यांच्या वतीने सोमवारी (ता. १०) विद्यार्थ्यांसाठी व्यसनमुक्ती जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या वेळी विद्यार्थ्यांनी व्यसनमुक्त जीवन जगण्याची सामूहिक प्रतिज्ञा घेतली.

1010516950

ब्रह्माकुमारी सरस्वती दीदी यांनी विद्यार्थ्यांमधील वाढते मोबाईलचे व्यसन, मोबाईलच्या अतिवापरामुळे होणारे मानसिक व शारीरिक दुष्परिणाम तसेच तरुण पिढी दारू, गांजा, सिगारेट यांसारख्या व्यसनांच्या आहारी गेल्यामुळे होणाऱ्या गंभीर परिणामांबाबत सखोल मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनी जीवनात मोठे ध्येय निश्चित करून चांगली संगत ठेवावी, असा संदेश त्यांनी दिला.

1010516956
1010516968

सध्याच्या काळात विद्यार्थ्यांमध्ये चंचलता वाढत असल्याने एकाग्रता वाढविणे गरजेचे आहे. यासाठी ब्रह्माकुमारी अमृता दीदी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून त्यांच्याकडून दहा मिनिटांचे ध्यान (मेडिटेशन) करून घेतले. ध्यानामुळे मनाची एकाग्रता, सकारात्मक विचार आणि आत्मविश्वास वाढण्यास मदत होते, असे त्यांनी सांगितले.

1010516971

या कार्यक्रमास स्वाती दीदी, बीके महेश भाई, जारकरवाडी येथील बीके नितीन भाई आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमास विद्यालयातील सुमारे २०० विद्यार्थी व १० शिक्षक उपस्थित होते.

1010516986

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यालयातील श्री. शेंगाळे सर यांनी केले, तर वळसे सर यांनी उपस्थितांचे आभार मानले. विद्यार्थ्यांनी मोबाईलचा अतिरेक टाळून व्यसनांपासून दूर राहण्याचा निर्धार केला.

Related posts

निरगुडसर ( ता.आंबेगाव ) येथे आंबेगाव तालुका माध्यमिक शाळा सेवकांच्या सहकारी पतसंस्थेची ४७ वी वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न !!

Chief Editor

देशातील ७५ आणि महाराष्ट्रातील दोन अमृत रेल्वे स्थानकांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण

Chief Editor

अरुण खरात यांना पद्मभूषण पत्रकार बाळासाहेब भारदे पुरस्कार जाहीर !!

Chief Editor

Leave a Comment