सामाजिक

पत्रकार समाजभूषण कैलास गायकवाड यांना “महाराष्ट्र भुषण पुरस्कार 2026” जाहीर !!

1010521928
1010521928

तथागत ग्रुप महाराष्ट्र राज्य संघटनेच्या वतीने सन्मान !!

पंचनामा प्रतिनिधी – पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील आदर्श समाजसेवक व पत्रकार समाज भूषण मा. कैलास बबनराव गायकवाड यांना तथागत बहुउद्देशीय संस्था मेहकर द्वारा आयोजित व तथागत ग्रुप महाराष्ट्र राज्य संघटनेच्या संयुक्त विद्यमाने “महाराष्ट्र भूषण पुरस्कार – 2026” जाहीर करण्यात आला आहे.समाजसेवा आणि पत्रकारितेच्या क्षेत्रात गेल्या अनेक वर्षांपासून गायकवाड यांनी केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन हा पुरस्कार जाहीर झाला आहे.

आंबेगाव तालुक्यातील सामाजिक, शैक्षणिक व आरोग्यविषयक उपक्रमांमध्ये त्यांचा मोलाचा वाटा आहे.

हा पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल तथागत ग्रुप महाराष्ट्र राज्य संघटनेचे समस्त पदाधिकारी, महिला आघाडी व कार्यकर्त्यांनी त्यांचे हार्दिक अभिनंदन केले आहे. संघटनेच्या वतीने लवकरच सन्मान सोहळा आयोजित करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.

पत्रकार समाज भूषण कैलासराव गायकवाड यांना पुरस्कार मिळाल्याबद्दल भटक्या मुक्त जाती शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ. शिवलाल जाधव तसेच जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील यांनी अभिनंदन केले आहे.

1010480394
1010457105

Related posts

धामणीत खंडोबाला फुलांची आरास व पारंपारिक श्रीखंड पुजा संपन्न !!

Chief Editor

पाबळ परिसरात पावसाची जोरदार बॅटिंग; दिर्घ विश्रांतीनंतर पावसाचे पुनरागमन !!

Chief Editor

महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना फेरतपासणी बाबत आंबेगाव तालुका पूर्व मंडलाचे अध्यक्ष किरण वाळुंज पाटील यांचे निवेदन

Chief Editor

Leave a Comment