
पंचनामा प्रतिनिधी – जारकरवाडी (ता.आंबेगाव ) येथील जिल्हा परिषेद प्राथमिक शाळेचे शिष्यवृत्ती परीक्षेत सन २०२६ इयत्ता चौथीचे पाच व सातवीचा एक विद्यार्थी शिष्यवृत्ती परीक्षेत पात्र ठरले असून त्यांच्यावर कौतूकाचा वर्षाव होत आहे.
इयत्ता चौथीचे पात्र विद्यार्थी लावण्या महेश वनवे-२७६ गुण जिल्ह्यात पहिली, शरण्या संदीप वैद-२६४ गुण जिल्ह्यात सातवी, स्वरा सुरज लबडे-२५८ गुण जिल्ह्यात दहावी, संस्कृती एकनाथ भोजने-२५६ गुण जिल्ह्यात अकरावी, संस्कृती विशाल भांड-२५२ गुण जिल्ह्यात तेरावी, तर इयत्ता सातवी भावना संदीप भोजने-२०२ गुण तालुक्यात तिसरी हे विद्यार्थी शिष्यवृत्ती परीक्षेत पात्र ठरले आहेत.
इयत्ता चौथीच्या विद्यार्थ्यांना रेखा सुनील वळसे यांनी मुख्य मार्गदर्शक म्हणून काम केले तर इयत्ता सातवीच्या विद्यार्थ्यांला सुदर्शन गंगाधर रासकर व गोरक्ष विष्णू उकिरडे यांनी सहकार्य केले. तर गंगुबाई वळसे, उज्वला नंदकुमार लंगडे,सुनीता गोपाळ रोडे,अशोक नामदेव किर्वे यांनी सहकार्य केले अशी माहिती मुख्याध्यापक अब्दुलरहीमान जलील इनामदार,शिवाजी मारुती चासकर यांनी दिली.
यशस्वी ठरलेल्या विद्यार्थांचे व त्यांना मार्गदर्शन करणार्या शिक्षकांचे केंद्रप्रमुख मच्छिंद्र काळे,विस्तार अधिकारी कल्पना टाकळकर,गट विकास अधिकारी प्रमिला वाळूंज,गटशिक्षण अधिकारी रूपाली धोका तसेच शालेय व्यवस्थापन समिती,समस्त पालक वर्ग, ग्रामपंचायत, विविध संस्थांच्या वतीने त्यांचे अभिनंदन करण्यात आले.




