सामाजिक

जागतिक रेबीज दिनानिमित्त नाशिक जिल्हा सर्व चिकित्सालयात नाशिक येथे रेबीज प्रतिबंधक शिबिर

1011109348
1011109348

पंचनामा प्रतिनिधी नाशिक – जागतिक रेबीज दिनानिमित्त नाशिक येथील जिल्हा सर्व चिकित्सालयाच्या वतीने रेबीज प्रतिबंधक लसीकरण व जनजागृती शिबिराचे आयोजन करण्यात आले. रेबीज हा प्राण्यांपासून मानवांमध्ये पसरणारा गंभीर व जीवघेणा आजार असून, योग्य वेळी लसीकरण आणि आवश्यक उपचार घेतल्यास त्याचा प्रतिबंध शक्य आहे. या उद्देशाने नागरिकांमध्ये रेबीजबाबत जनजागृती करण्यात आली.

या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. सदाशिव बेंडकाळे जिल्हा उपआयुक्त पशुसंवर्धन उपस्थित होते. तसेच डॉ. प्रकाश आहेर सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन, डॉ. प्रतिभा कोरे, डॉ. वैभव आहेर पशुधन विकास अधिकारी आणि डॉ. किरण जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती.तसेच वर्णोपचार सुनील गायकवाड , शरद लोखंडे व इतर कर्मचारांचे मोलाचे सहकार्य लाभले.

यावेळी रेबीजचा प्रसार, कुत्रा किंवा इतर प्राण्यांच्या चाव्यानंतर घ्यावयाची काळजी, जखम तात्काळ साबण व पाण्याने स्वच्छ धुण्याचे महत्त्व तसेच वेळेत रेबीज प्रतिबंधक लसीकरण घेण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. पाळीव प्राण्यांचे नियमित लसीकरण करून रेबीजचा धोका कमी करण्याचे आवाहनही करण्यात आले.

शिबिराच्या माध्यमातून प्राण्यांचे आरोग्य आणि सार्वजनिक आरोग्य यांचा परस्पर संबंध अधोरेखित करण्यात आला. “रेबीजमुक्त समाजासाठी प्राणीमालक, पशुवैद्यकीय विभाग आणि नागरिकांनी एकत्रितपणे प्रयत्न करणे आवश्यक आहे,” असा संदेश यावेळी देण्यात आला.

1011109343

नाशिक जिल्हा सर्व चिकित्सालयाच्या वतीने आयोजित या उपक्रमाला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. कार्यक्रमाच्या माध्यमातून ‘One Health’ या संकल्पनेनुसार मानव आणि प्राणी आरोग्याच्या संरक्षणासाठी जनजागृती करण्यात आली.

1011080919

Related posts

३० जूनपर्यंत HSRP नंबर प्लेट बसवा; १ जुलैपासून नियमभंग करणाऱ्यांवर पोलिस आणि परिवहन अधिकाऱ्यांकडून कडक कारवाई !!

Chief Editor

प्रकाश सापळ्यांद्वारे करा हुमणी किडीचे प्रभावी नियंत्रण !!

Chief Editor

असे तमाशाफड ; असे तमाशा व्यवस्थापक – मा.बाळासाहेब विरळीकर

Chief Editor

Leave a Comment