सामाजिक

धामणी (लोणी) येथे कुलस्वामी खंडोबा देवस्थान परिसरात अकरा लाखाच्या लोकवर्गणीतून बांधला गेला जलकुंभ !!

img 20260121 wa0579

पंचनामा लोणी (धामणी) प्रतिनिधी – धामणी (ता.आंबेगांव) येथील श्री कुलस्वामी म्हाळसाकांत खंडोबा देवस्थान परिसरात भाविकांच्या पिण्याचे पाण्याच्या सुविधेसाठी लोकवर्गणीतून रुपये अकरा लाख खर्च करुन चाळीस हजार लिटर क्षमतेचा जलकुंभ( पाण्याची टाकी) बांधण्यात आलेली असल्याचे ग्रामस्थ व सेवेकरी मंडळीनी सांगितले.

धामणी येथील हे खंडोबा देवस्थान पुणे,नगर,नाशिक व मुंबई जिल्ह्यातील लाखो भाविकांचे श्रध्दास्थान व कुलदैवत असून माघ पोर्णिमेच्या यात्रेला तळीभंडार व दर्शनासाठी देवकार्यासाठी हजारो भाविक सहकुटुंब येतात.यात्रेच्या तीन दिवस कालावधीत भाविकांचा देवस्थान परिसरात मुक्काम असतो.गेल्या काही वर्षात धामणीच्या यात्रेला हजारो भाविक श्रध्देने मुक्कामी येतात.वाढत असलेल्या भाविकांच्या संख्येमुळे त्यांना वापरण्यासाठी पाण्याचा पुरवठा करणार्‍या दोन पाण्याच्या टाक्या अपुर्‍या पडू लागल्यामुळे भाविक मंडळीनी लोकवर्गणीतून नवीन मोठी पाण्याची अद्ययावत टाकी बांधण्याची मागणी मागील वर्षीच्या(फेब्रुवारी २०२५) यात्रेत देवस्थानाकडे केलेली होती. देवस्थानाने रुपये अकरा लाख लोकवर्गणीतून जमा करुन जलकुंभाचे काम पूर्ण केलेले असून येणार्‍या माघ पौर्णिमेच्या यात्रेच्या कालावधीत (१ फेब्रुवारी २६ ते ३ फेब्रुवारी२६)भाविकांना शुध्द पिण्याचे पाण्याची सुविधा उपलब्ध होणार असल्याचे ग्रामस्थ व सेवेकर्‍यांनी सांगितले.

img 20260121 wa0578

पुढील कालावधीत भाविकांच्या सोईसाठी लोकवर्गणीतून अन्य विकास कामे करणार असल्याचे ग्रामस्थांनी यावेळी सांगितले.

fb img 1768108641525

Related posts

आई वडिलांची,देशाची सेवा करा; तरुणांनी व्यसनापासून दूर रहा – ह. भ.प.निवृत्ती महाराज देशमुख

Chief Editor

आळंदीत मुक्तादेवी धर्मशाळेत मूर्तींची प्राणप्रतिष्ठापना झाली संपन्न !!

Chief Editor

वाळुंजनगर येथे बिबटयाचा वावर वाढला. शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण !!

Chief Editor

Leave a Comment