सामाजिक

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जारकरवाडीच्या शिरपेचात मनाचा तुरा!!

img 20260121 wa0891

पंचनामा लोणी (धामणी) प्रतिनिधी – आंबेगाव तालुक्यातील सर्वार्थाने प्रगतशील गाव म्हणून ओळख असणाऱ्या जारकरवाडी गावच्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेने यशवंतराव कला क्रीडा महोत्सव २०२५-२६ मध्ये घवघवीत यश संपादित केले आहे.

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जारकरवाडीने खो-खो स्पर्धेमध्ये मुलींच्या संघाने मोठ्या गटांमध्ये प्रथम क्रमांक मिळवून शाळेचा नावलौकिक कायम राखला आहे.

img 20260121 wa0889

आट्यापाट्या संघामध्ये मुलींचे संघाने तृतीय क्रमांक मिळविला.वैयक्तिक स्पर्धेमध्ये तृप्ती जयराम लबडे हिने
1) उंच उडी मध्ये द्वितीय क्रमांक
2) लांब उडी मध्ये तृतीय क्रमांक
प्राप्त केला आहे.

img 20260121 wa0891

यशवंतराव कला क्रीडा महोत्सवात जिल्हास्तरीय स्पर्धेमध्ये शाळेने उत्तुंग अशी कामगिरी करून शाळेचे नाव जिल्ह्यामध्ये उंचाविले आहे.

सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे व त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या गुरुजनांचे पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मा. गजानन पाटील,पुणे जिल्हा शिक्षणाधिकारी मा.संजय नाईकडे,आंबेगाव पंचायत समिती गटशिक्षणाधिकारी रूपाली धोका,शिक्षण विस्ताराधिकारी कल्पना टाकळकर,केंद्रप्रमुख मच्छिंद्र काळे, शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष, उपाध्यक्ष, सदस्य,विविध संस्थांचे पदाधिकारी, समस्थ ग्रामस्थ जारकरवाडी यांनी अभिनंदन केले आहे.

Related posts

पारगाव (शिंगवे) मध्ये सायबर सुरक्षेसह व्यसनमुक्ती जनजागृती अभियान; विद्यार्थ्यांना सुरक्षेची शपथ !!

Chief Editor

पुणे जिल्ह्यातील ५३ शिक्षक, ५२२ गुणवंत विद्यार्थी,अध्यक्ष चषक स्पर्धेतील विजेत्यांचा सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित दादा पवार यांच्या हस्ते सन्मान !!

Chief Editor

आंबेगाव तालुक्यातील काठापूर बुद्रुक गावातील तरुणांनी जपली ७० वर्षांची नाट्य परंपरा!!

Chief Editor

Leave a Comment