सामाजिक

विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यात ६५ टक्के अर्जांचे डिजिटायझेशन पूर्ण

fb img 1786424009379
1010525765

पंचनामा प्रतिनिधी – भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार जिल्ह्यात सुरू असलेल्या मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत आतापर्यंत ९६ टक्के अर्जांचे वितरण पूर्ण झाले असून ६५.५३ टक्के अर्जांचे डिजिटायझेशन पूर्ण झाले आहे, अशी माहिती उप जिल्हा निवडणूक अधिकारी मीनल कळसकर यांनी दिली.

जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित राजकीय पक्षांच्या साप्ताहिक बैठकीत त्या बोलत होत्या. यावेळी तहसीलदार शीतल मुळे यांच्यासह नॅशनल पीपल्स पार्टी, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार), राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजित पवार), भारतीय जनता पक्ष, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे), बहुजन समाज पार्टी, महाराष्ट्र नवनिर्माण सेना आदी राजकीय पक्षांचे जिल्हाध्यक्ष, शहरप्रमुख, सचिव तसेच प्रतिनिधी उपस्थित होते.

अनुपस्थित, स्थलांतरित, मयत व दुबार मतदारांच्या याद्या संकेतस्थळावर
उपजिल्हा निवडणूक अधिकारी मीनल कळसकर म्हणाल्या, अनुपस्थित, स्थलांतरित, मयत तसेच दुबार मतदारांची यादी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. राजकीय पक्षांनी या याद्यांचे अवलोकन करून त्याबाबत आवश्यक ती कार्यवाही करावी. तसेच नमुना क्रमांक ६, ७ व ८ मधील अर्जांचे अवलोकन करून मतदार यादी अद्ययावत करण्यासाठी त्याचा उपयोग करावा.
मतदार यादी अधिक अचूक व अद्ययावत करण्यासाठी प्रशासनाकडून विशेष प्रयत्न करण्यात येत आहेत. या प्रक्रियेत राजकीय पक्षांचे सहकार्य महत्त्वाचे असून प्राप्त होणारे दावे व हरकती विहित मुदतीत निकाली काढण्यासाठी प्राधान्याने नियोजन करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.

पदवीधर, शिक्षक मतदार नोंदणीसाठी सहकार्याचे आवाहन
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार पदवीधर व शिक्षक मतदार याद्या तयार करण्याची प्रक्रिया लवकरच सुरू होणार आहे. या प्रक्रियेत शिक्षक व पदवीधर मतदारांची जास्तीत जास्त नोंदणी होण्यासाठी राजकीय पक्षांनी सहकार्य करावे, असे आवाहनही श्रीमती कळसकर यांनी केले.
बैठकीत विविध राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींनी मतदार यादी पुनरीक्षण प्रक्रियेसंदर्भात अडचणी व सूचना मांडल्या. यावेळी उपजिल्हा निवडणूक अधिकारी मीनल कळसकर यांनी संबंधित अडचणींचे निरसन केले.

1010522776
1010517049
1010457105

Related posts

२७ एप्रिल – जागतिक तरस दिवस !!

Chief Editor

महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत संघटनेच्या आंबेगाव तालुका अध्यक्षपदी श्री.के.डी.भोजने यांची बिनविरोध निवड तर सचिवपदी अतुल डामसे !!

Chief Editor

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वाळुंजनगर येथे उत्साहात संपन्न झाला बालचमुचा दिंडी सोहळा !!

Chief Editor

Leave a Comment