सामाजिक

फुलांचे भाव घसरले; बळीराजा सापडला आर्थिक संकटात !!

1010526137

पंचनामा प्रतिनिधी – आंबेगाव तालूकाच्या पूर्व भागातील लोणी,धामणी, लाखणगाव,जारकरवाडी,पोंदेवाडी परिसरात मोठ्या प्रमाणात वेगवेगळ्या जातींच्या फुलांची लागवड केली जाते.आता लागवड केलेली फुलांच्या झाडांची फूले तोंडणी सुरू असून बाजारभाव घसरल्याने फूल उत्पादक शेतकरर्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

सध्या फुलांचे भाव घसरले असून दहा किलोला ५० ते ६० रुपये बाजार भाव मिळत असल्याने फूल उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात आले आहेत. मागील आठवड्यात सतत पडणार्या पावसाने तयार झालेली फुले झाडवरच सडून जात होती. आता पावसाने थोडीफार विश्रांती घेतली तर फूलांचे भाव घसरल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. फूले तोडायला आल्यावर तोडणीसाठी मजूरांना २०० ते ३०० रुपये मजूरी घ्यावी लागते. शिवाय वाहातूकीचा खर्च त्यामुळे उत्पादन आणि खर्च यांचा ताळमेळ बसत नाही. सध्या फूलांचे बाग जोमात असून भाव घसरल्याने शेतकरी चिंतेत आहे. सध्या फूलांना मिळत असलेला बाजारभाव खूपच कमी आहे. त्यातून भांडवली खर्चही निघत नाही. सध्या बाजारात प्लॅस्टिकची फुले विक्रीसाठी मोठ्या प्रवाणावर येत असल्याने शासनाने त्या फुलांवर बंदी घालावी अशी मागणी जारकरवाडी येथील बढेकरमळ्यातील फूलउत्पादक शेतकरी मच्छिंद्र बढेकर व सुरेश बढेकर यांनी केली आहे.

1010522631
1010516783
1010480394

Related posts

करिअर डे ने उजळले समर्थ आय टी आय च्या विद्यार्थ्यांचे भविष्य 28 विद्यार्थ्यांची निवड !!

Chief Editor

वारकऱ्यांच्या सोयी सुविधांसाठी ग्रामविकास विभागाकडून सहा कोटी रुपयांचा निधी – ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे

Chief Editor

लोणी (धामणी ) येथे महाशिवरात्री यात्रेनिमित्त शर्यतीमध्ये धावले ३५० बैलगाडे !!

Chief Editor

Leave a Comment