सामाजिक

हिंगेवस्ती- अवसरी बुद्रक ते पहाडदरा रस्त्याच्या घाटात धोकादायक काटेरी झाडा-झुडपांनी विळखा !!

1010526270
1010526270

पंचनामा प्रतिनिधी – आंबेगाव तालुक्यातील हिंगेवस्ती- अवसरी बुद्रक ते पहाडदरा रस्त्याच्या घाटात बर्याच ठिकाणी धोकादायक काटेरी झाडा-झुडपांनी विळखा घातला आहे. या रस्त्यावर असलेल्या वळणावर झाडांमुळे रस्ता दिसत नसल्याने अपघात होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने सदर रस्त्यावरील अपघातांची वाट न पाहता धोकादायक वळणावरील झाडे झुडपे काढावी अशी मागणी पहाडदर्यांचे सरपंच मच्छिंद्र शिवराम वाघ, उपसरपंच कैलास वाघ, संकेत वायकर, वाहान चालक व स्थानिक ग्रामस्थांनी केली आहे.

हिंगे वस्ती- अवसरी बुद्रूक ते पहाडधरा या ररत्यावरील घाटात जवळ-जवळ पूर्ण घाटात रस्त्याच्या कडेला मोठा प्रमाणत झाडेझुडपे व त्यांच्या फांद्या रस्त्यावर आल्या आहेत त्यामुळे रस्त्यावरील वाहन चालकांना झाडा-झुडपांचा अडसर होत आहे. शिवाय धोकादायक वळण असल्याने अनेकदा अपघात होता होता वाचले आहे त्यामुळे
प्रशासनाने या रस्त्यावरील वाढलेली झाडे-झुडपे त्वरीत काढून टाकावीत, अशी मागणी ग्रामस्थ व वाहनचालकांमधून केली जात आहे.

लोणी ते जारकरवाडी मार्ग निसुडसर फाट्यापर्यंत अनेक ठिकाणी रस्त्यावर लहान मोठे खड्डे आहेत. त्यामुळे लोणी, धामणी परिसरातील नागरिक, विद्यार्थी, नोकरदार, स्थानिक नागरिक, तसेच शेतकरी वर्ग या रस्त्याला वापर करतात त्यामुळे रस्त्यावर बर्यापैकी वर्दळ आहे.

तसेच निरगुडसर फाटा ते मंचर या रस्त्याचे काम सुरू आहे. पण दुसरा जवळला पर्यायी रस्ता नसल्याने सध्या या रस्त्यावरून बर्यापैकी वर्दळ सुर आहे. पण येथील रस्त्याच्या कडेला दाट झाडे-झुडपे वाढली आहेत. त्यामुळे समोरुन येणारे वाहन वाहनचालकांना दिसत नाही. त्यामुळे स्त्यालगत असणारी झाडे-झुडपे तातडीने काढण्याची मागणी जोर धरु लागली आहे. परिणामी या ठिकाणी एखादा मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच या घाटमाथ्यावर पहाडदधर्यांच्या पश्चिमेला घाटमाथ्यावर पुरातन महादेवाचे मंदिर असल्याने व घाटमाथ्यावर असणारा हिरवागार परीसर यामुळे हौसेगवसे तालुक्यातील पर्यटक येथे येत असतात. त्यामुळे या मार्गावर झाडा झुडपांमुळे वाहान चालकांना, स्थानिक नागरीकांना याचा नाहक त्रास होत आहे.त्यामुळे संबंधीत विभागाने याकडे लक्ष देण्याची गरज आहे.

हिंगेवस्ती-अवसरी बुद्रक ते पहाडदरा रस्त्याला झाडा झुडपांचा विळखा

1010522631
1010516783
1010480394

Related posts

पंचनामा विशेष – साने गुरुजी

Chief Editor

समर्थ मध्ये कौशल्य विकास कार्यशाळा उत्साहात संपन्न !!

Chief Editor

माळरानावर बहरतेय कलिंगडाची शेती; धामणी गाव पुसू पाहते आहे आपली दुष्काळी ओळख !!

Chief Editor

Leave a Comment