सामाजिक

लोणी (धामणी) परिसरात आधीच बिबट्याची भीती त्यात वन्य प्राणी करतायेत पिकांची नासाडी!!

img 20260121 wa0359

पंचनामा लोणी (धामणी) प्रतिनिधी – लोणी ( ता.आंबेगाव) येथील बागवस्ती व वाफगाव रस्ता डोंगर भाग,खंडोबा डोंगर भाग या परिसरात ज्वारी,बटाटा, कांदा,भूईमूग आदि पिके जोमात आली असताना वन्यप्राण्यांच्या वाढत्या उपद्रवामुळे शेतकर्यांची चिंता वाढली आहे.

डोंगराळ भागाची भौगोलिक रचना,दाट झाडी आणि सुरक्षित दडण मिळल्यामुळे रानडुकरे,तरस,कोल्हे,हरणे या प्राण्यांचा वावर मोठ्या प्रमाणात वाढला असून हे प्राणी टोळ्यांनी येऊन शेतात धुडगूस घालत आहेत.

मे महिन्या पासून चांगला पाऊस झाल्याने शेतकर्यांनी योग्य अंदाज घेऊन पिकांची लागवड व पेरणी केली आहे.सध्या हि पिके जोमात आली आहेत.मात्र रानटी प्राणी सतत शेतात घुसून ज्वारी,बटाटा,कांदा,भूईमूग पिकांची मोठ्या प्रमाणावर नासधूस करत आहेत. त्यामुळे शेतकर्यांना मोठा आर्थिक फटका बसत असून उत्पादनावर मोठा परिणाम होत आहे.

img 20260121 wa0358

आपल्या पिकांचे रक्षण करण्यासाठी शेतकरी विविध उपाययोजना करून पहात आहेत. शेतमालाचे उत्तरलेले बाजारभाव यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. आणि त्यातच रानटी प्राण्यांच्या वाढत्या संख्येमुळे समस्या अधिकच तीव्र झाली आहे.या परिस्थितीत वन विभागाने तातडीने लक्ष घालून रानटी प्राण्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी प्रगतशील शेतकरी व पोलिस पाटील संदिप आढाव, बाळासाहेब आढाव, दतात्रय वाघोले व येथील शेतकर्यांनी केली आहे.

fb img 1768108641525

Related posts

पुणे जिल्ह्यात रेड अलर्टच्या पार्श्वभूमीवर पुणे शहर व पुणे जिल्हा (ग्रामीण) येथील सर्व शाळांना सोमवार ६ जुलै रोजी सुट्टी; जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांचे आदेश

Chief Editor

पारगाव (शिंगवे) गावचे मा.उपसरपंच श्री.विठ्ठल सिताराम ढोबळे यांनी जपली सामाजिक बांधिलकी; वाढदिवसाचा अनावश्यक खर्च टाळून रक्तदान शिबिराचे आयोजन!!

Chief Editor

विजय कोल्हापूरे यांचा श्रीराम पायी दिंडी पिंपळगाव (खडकी) यांच्या वतीने सन्मान !!

Chief Editor

Leave a Comment