सामाजिक

पारगाव (शिंगवे) गावचे मा.उपसरपंच श्री.विठ्ठल सिताराम ढोबळे यांनी जपली सामाजिक बांधिलकी; वाढदिवसाचा अनावश्यक खर्च टाळून रक्तदान शिबिराचे आयोजन!!

img 20260212 wa0543
img 20260212 wa0546

पंचनामा पारगाव (शिंगवे) प्रतिनिधी – आंबेगाव तालुक्यातील सर्वार्थाने प्रगतशील गाव म्हणून ओळख असणाऱ्या पारगाव गावाने नेहमीच सामाजिक बांधिलकी जपली आहे. आज पुन्हा एकदा नव्याने या गोष्टीचा प्रत्यय आला.

पारगावचे मा.उपसरपंच विठ्ठल सिताराम ढोबळे यांच्या वाढदिवसानिमित्त गेल्या तीन वर्षांपासून भव्य रक्तदान शिबिर आयोजित केले जात आहे.यावेळी २४१ रक्तदात्यानी उच्चांकी सहभाग नोंदवला.

वाढदिवसाचा अनावश्यक खर्च टाळून रक्तदान शिबिराचे आयोजन केल्याबद्दल पारगाव (ता.आंबेगाव) चे मा.उपसरपंच विठ्ठल सिताराम ढोबळे यांचे मा.मंत्री दिलीपराव वळसे पाटील साहेब यांनी २४१ रक्तदात्याचे तसेच माजी उपसरपंच विठ्ठल ढोबळे यांचे कौतुक केले.

img 20260212 wa0544

विठ्ठल ढोबळे दरवर्षी वाढदिवसानिमित्त समाजाभिमुख उपक्रम राबवितात. यंदाही त्यांनी भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते.ग्रामीण भागातील तरुणांनी एकत्र येऊन येथून पुढेही असेच सामाजिक कार्य केले पाहिजे तसेच ५ महिलांनी देखील रक्तदान केले असल्याचे घोडेगाव पंचायत समितीच्या गटशिक्षणाधिकारी सौ. रुपालीताई धोका यांनी सांगितले.

या शिबिराला भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष प्रदिप वळसे पाटील,संचालक रामचंद्र ढोबळे,बाळासाहेब घुले,ज्ञानेश्वर अस्वारे,विलास लबडे,भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक चंद्रकांत ढगे, पंचायत समितीच्या गटशिक्षणाधिकारी सौ रुपाली ताई धोका,मा.उपसरपंच विठ्ठल ढोबळे,चिफ अकौंटट राजेश वाकचौरे,पर्चेस अधिकारी ब्रिजेश लोहोट,स्टोअर किपर अनिल बोंबले,श्रीनिवास एजन्सी पारगाव सुनील टाव्हरे,ग्रामपंचायत सदस्य दत्तात्रय वैद्य,विरेंद्र ढोबळे,ह.भ.प.निवृत्ती महाराज लोखंडे,सुरक्षा अधिकारी कैलास गाढवे,ग्रामविकास अधिकारी के.डी.भोजणे,उपसरपंच हिरामण गोरडे,मा.उपसरपंच दिनेश खेडकर,सचिन अस्वारे,आदेश थोरात,गव्हर्नमेंट कॉन्ट्रक्टर ओंकार ढोबळे,सचिन ढोबळे,माजी सरपंच अंकुश भुमकर,नारायण लोले,विजय वळसे सर, दिपक वळसे पाटील,अंकुश काळे,शांताराम गोरडे,मच्छिंद्र ढोबळे, तसेच परिसरातील आदी मान्यवर उपस्थित होते.

fb img 1769478999823

शिबिराचे आयोजन चक्रेश्वर मेडीकल फाऊंडेशन व चाकण ब्लड सेंटरने केले.मा.उपसरपंच विठ्ठल ढोबळे यांनी सर्व रक्तदात्याचे आभार मानले

Related posts

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शिंगवे शाळेतील किशोरवयीन मुलींच्या सर्वांगीण विकासासाठी उपक्रम !!

Chief Editor

न्यू इंग्लिश स्कूल लाखणगावच्या विद्यार्थिनींना मोफत शैक्षणिक साहित्य वाटप !!

Chief Editor

जिल्हास्तरीय दिव्यांग शालेय क्रीडा स्पर्धेत पाबळ शाळेचे उल्लेखनीय यश !!

Chief Editor

Leave a Comment