सामाजिक

आत्मविश्वास, प्रामाणिक प्रयत्न, निश्चित ध्येय असल्यास यश निश्चित – लेफ्टनंट तुळशीराम देवराम आदक

img 20260121 wa0164
img 20260121 wa0164

पंचनामा लोणी (धामणी) प्रतिनिधी – आपल्या जीवनप्रवासातून विद्यार्थ्यांनी परिस्थिती कितीही कठीण असली तरी ध्येय पक्के असेल,मेहनत प्रामाणिक असेल आणि आत्मविश्वास जिवंत असेल तर शंभर टक्के यश नक्की मिळेल असे प्रतिपादन भारतीय नौसेनेत तब्बल तीस वर्षे देशसेवा बजावलेले निवृत्त नेव्ही अधिकारी लेफ्टनंट तुळशीराम देवराम आदक यांनी केले.

वडगावपीर (ता.आंबेगाव ) येथील प्रगती विद्यालयात माजी विद्यार्थी संघ व विद्यालयाने आयोजीत केलेल्या इयत्ता १० वी व १२ वी नंतर पुढे काय ? व सैन्य दलातील उज्ज्वल संधी या विषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शान करताना आदक बोलत होते.

ते पुढे म्हणाले कि विद्यार्थ्यांनी विद्यार्थी दक्षेत आपले ध्येय निश्चित करून परिस्थितीची जानिव ठेवून अभ्यास केला पाहिजे यश नक्की येणार. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या डोळ्यातील स्वप्नांना योग्य दिशा मिळावी,त्यांच्या मनातील संभ्रम दूर व्हावा आणि भविष्यासाठी आत्मविश्वासाने पहिले पाऊल टाकता यावे या उदात्त हेतूने माजी विद्यार्थी संघ वडगावपीर यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

fb img 1768108641525

यावेळी मुख्याध्यापिका उज्वला भालेराव,माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष विश्वनाथ साबळे,माजी उपसरपंच रविंद्र गुळवे,रविद्र भालेराव, यश आदक, सुवर्णा आदक, मंजूळा आदक सर्व शिक्षक, विद्यार्थी व माजी विद्यार्थी उपस्थित होते.

Related posts

युवा ताशावादक जालिंदर शेवाळे यांना आंबेगाव भूषण पुरस्कार प्रदान !!

Chief Editor

शुगर इथेनॉल बायोएनर्जी कॉन्फरन्स मध्ये शुगर इंडस्ट्रीज परिवार चा गौरव

Chief Editor

समर्थ आयटीआयच्या ४६ विद्यार्थ्यांची कॅम्पस इंटरव्ह्यूमध्ये निवड !!

Chief Editor

Leave a Comment