सामाजिक

विद्यार्थ्यांनी तणावमुक्त जीवन जगत सकस आहार व व्यायामाला प्राधान्य द्यावे ; निरगुडसर येथे विद्यार्थ्यांसाठी आरोग्यविषयक मार्गदर्शन कार्यक्रम !!

1010697344
1010697344

पंचनामा प्रतिनिधी – निरगुडसर (ता. आंबेगाव) विद्यार्थ्यांनी शिक्षण घेत असताना ताण-तणावापासून दूर राहून आनंदी व तणावमुक्त जीवन जगावे. तसेच दैनंदिन जीवनात नियमित व्यायाम, सकस व संतुलित आहाराला प्राधान्य देत शारीरिक व मानसिक आरोग्याची काळजी घ्यावी, असे आवाहन आरोग्य सल्लागार निलम भागडे यांनी केले.

निरगुडसर येथील पंडित जवाहरलाल नेहरू माध्यमिक विद्यालय व दत्तात्रय गोविंदराव वळसे पाटील उच्च माध्यमिक विद्यालयात विद्यार्थ्यांसाठी आरोग्यविषयक मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी भागडे यांनी विद्यार्थ्यांना आरोग्याची काळजी, सकस आहार, नियमित व्यायाम आणि तणावमुक्त जीवनशैली याबाबत मार्गदर्शन केले.

पालकांनी मुलांच्या आवडी-निवडी व कलागुण ओळखून त्यांना प्रोत्साहन द्यावे, तसेच योग्य संस्कार करावेत. शारीरिक आरोग्याबरोबरच मानसिक स्वास्थ्याची काळजी घेणेही तितकेच महत्त्वाचे असल्याचे भागडे यांनी सांगितले.

या कार्यक्रमास निरगुडेश्वर शिक्षण संस्थेचे अध्यक्ष ॲड. प्रदीप वळसे पाटील, उपसरपंच भाऊसाहेब वळसे पाटील, माजी उपसरपंच आनंदराव वळसे पाटील, तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष सुरेश टाव्हरे, सोसायटीचे चेअरमन मंगेश मुंडके, रामचंद्र वळसे पाटील, माजी चेअरमन सुरेश आवारी, उदय हांडे देशमुख, अशोक मेंगडे, प्राचार्य कांताराम टाव्हरे, पर्यवेक्षक संतोष वळसे यांच्यासह शिक्षकवृंद व विद्यार्थी उपस्थित होते.

1010688861
1010688815

Related posts

नाशिक रोड मध्यवर्ती कारागृहात ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’ उत्साहात संपन्न; कैदी आणि अधिकारी वर्गाचा उत्स्फूर्त प्रतिसाद !!

Chief Editor

अवसरी बुद्रुक येथे उद्योजकता विकास प्रशिक्षण !!

Chief Editor

पारगाव (शिंगवे) येथील संकेत अस्वारे यांची मुंबई पोलिस मध्ये निवड !!

Chief Editor

Leave a Comment