सामाजिक

लोणी (धामणी ) येथे रंगीबेरंगी राख्यांचे स्टॉल सजले !!

1010697413

पंचनामा प्रतिनिधी – लोणी : रक्षाबंधन सण अवघ्या दोन दिवसांवर आल्याने आंबेगाव तालुक्यातील निसुडसर, लोणी, धामणी तसेच परिसरातील बाजारपेठा रंगीबेरंगी राख्यांनी सजल्या आहेत. बाजारात यंदा विविध आकर्षक व फॅन्सी डिझाईनच्या राख्या विक्रीसाठी उपलब्ध झाल्या असून, महिलांकडून त्यांना मोठी मागणी होत आहे.

यंदा वाढत्या महागाईचा परिणाम राख्यांच्या दरावरही झाला असून, १०० रुपयांपासून १ हजार रुपयांपर्यंत डझनाला राख्या उपलब्ध आहेत. रेशीम, जरी, नायलॉन, वेलवेट, म्युझिकल चायनीज, कुंदन तसेच पारंपरिक गोंडा राख्यांचे विविध प्रकार बाजारात दाखल झाले आहेत.

लोणी येथील राखी विक्रेते ज्योती शहा यांनी सांगितले की, यंदा नाविन्यपूर्ण फॅन्सी डिझाईनच्या राख्यांना ग्राहकांची पसंती मिळत आहे. मुंबई, पुणे, नगर, नवी मुंबई, मंचर, शिरूर, खेड आणि नारायणगाव येथून राख्यांची खरेदी केली जाते.

दरम्यान, देवदेवतांची चित्रे असलेल्या राख्यांची मागणी कमी होत असून, चित्रपटातील नटनट्यांची चित्रे असलेल्या राख्यांना अधिक पसंती मिळत असल्याचे दिसून येत आहे. परिसरात यंदा पावसाने चांगली हजेरी लावल्याने रक्षाबंधनाचा सण उत्साहात साजरा होणार असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले.

1010688861
1010688815

Related posts

तमाशाफड मालक विलास गायकवाड उर्फ राज देवठाणकर यांचे निधन हे सरकारी अनस्थेचा बळी आहे- अरुण खरात ( तमाशा लोककला व लोक कलावंत अभ्यासक)

Chief Editor

जिल्हा परिषद शिंगवे शाळेला A+ श्रेणी मानांकित !!

Chief Editor

टी.व्ही.एस कंपनीच्या वतीने खडकवाडी येथे ‘जागतिक महिला दिन’ उत्साहात साजरा !!

Chief Editor

Leave a Comment