सामाजिक

अंगणवाडीतील आहाराच्या गुणवत्तेबाबत तडजोड नाही ; सरकार ॲक्शन मोडमध्ये – महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांचे कडक निर्देश !!

1010698124

पंचनामा प्रतिनिधी – पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यात अंगणवाडीतील निकृष्ट पोषण आहाराचा प्रकार समोर आल्यानंतर आता राज्य सरकार ॲक्शन मोडमध्ये आले आहे. पांढरा वाटाणा आणि भरडा निकृष्ट दर्जाचा असल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर महिला व बालविकास विभागाने राज्यातील अंगणवाड्यांमधील पोषण आहाराच्या गुणवत्तेची तातडीने तपासणी करण्याचे आदेश दिले आहेत.

महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी बालकांच्या पोषणाच्या बाबतीत कोणतीही तडजोड केली जाणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. राज्यातील सर्व अंगणवाड्यांमध्ये दिल्या जाणाऱ्या पोषण आहाराची गुणवत्ता तपासण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत.

48 तासांत प्रत्यक्ष पाहणी- अंगणवाडीतील पोषण आहाराच्या गुणवत्तेबाबत तक्रारी समोर आल्यानंतर प्रशासनाने कठोर पावले उचलली आहेत. पुढील 48 तासांत अधिकाऱ्यांनी अंगणवाड्यांना प्रत्यक्ष भेट देऊन पोषण आहाराची पाहणी करावी, तसेच त्याची गुणवत्ता तपासावी, असे निर्देश देण्यात आले आहेत.

आंबेगाव तालुक्यातील संबंधित प्रकरणात पांढरा वाटाणा आणि भरडा निकृष्ट असल्याचा आरोप करण्यात आला होता. त्याचा व्हिडीओ समोर आल्यानंतर हे प्रकरण चर्चेत आले.

सेविकेचे निलंबन मागे – या प्रकरणात संबंधित अंगणवाडी सेविकेवर करण्यात आलेली निलंबनाची कारवाईही मागे घेण्यात आली आहे. दरम्यान, पोषण आहाराच्या गुणवत्तेत हलगर्जीपणा किंवा तडजोड आढळल्यास संबंधितांवर कारवाई केली जाईल, असे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

1010688861
1010688815
1010690614

Related posts

जवळे (ता.आंबेगाव) येथील शिंदे मळ्यात बिबट्याचा वावर; कुत्र्यावर हल्ला !!

Chief Editor

पारगाव (शिंगवे) येथे संपन्न झाला एकल महिला दिन !!

Chief Editor

अवकाळी पाऊस व गारपीटग्रस्त शेतकऱ्यांना नुकसान भरपाई त्वरित मिळावी;अखिल भारतीय ग्राहक पंचायतीची मागणी !!

Chief Editor

Leave a Comment