सामाजिक

समर्थ शैक्षणिक संकुलात भव्य रोजगार मेळावा ; विद्यार्थ्यांच्या कौशल्यांना उद्योगविश्वाशी जोडणारा उपक्रम; नामांकित कंपन्यांचा सहभाग !!

1010648701

पंचनामा प्रतिनिधी – समर्थ रुरल एज्युकेशनल इन्स्टिट्यूट संचालित समर्थ शैक्षणिक संकुल, बेल्हे-बांगरवाडी येथे विद्यार्थ्यांना विविध क्षेत्रांमध्ये रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने भव्य रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. अभियांत्रिकी, फार्मसी, कॉम्प्युटर सायन्स तसेच विविध शैक्षणिक विभागांतील तब्बल ३१० विद्यार्थ्यांनी या रोजगार मेळाव्यात सहभाग नोंदविला. विविध नामांकित कंपन्यांच्या प्रतिनिधींच्या सहभागामुळे मेळाव्यास उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.

मेळाव्यात सहभागी झालेल्या कंपनी प्रतिनिधींचा संस्थेचे सचिव विवेक शेळके व विश्वस्त वल्लभ शेळके यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.

या रोजगार मेळाव्यात
आयसीआयसीआय बँक –
अरबाज शेख,
अजिओ फार्मास्युटिकल्स –
गणेश कांबळे,
मार्क्सन्स फार्मा लि.-
काजल हेळगावकर,
पॅट्रोटॉनिक्स कन्सल्टिंग सर्व्हिसेस
सविता शिवशरण,
सीमेन्स कंपनीच्या वतीने –
गोपाळ आवळे व नितीन कदम,
टेक महिंद्रा कंपनीच्या वतीने – कल्लोल बोस,
जॅबिल सर्किट इंडिया प्रा. लि.
ज्ञानेश्वर घाटोळे व आकाश गायकवाड,
एआरएम इंडियाच्या वतीने
विश्वनाथ पाटोळे,
एलिओस मॅनेजमेंट कन्सल्टिंग प्रा. लि.संतोष स्वामी
निर्माण ऑर्गनायझेशन-
शिवलिंग स्वामी यांनी सहभाग घेत विद्यार्थ्यांच्या निवड प्रक्रियेस मार्गदर्शन केले.

सहभागी कंपन्यांच्या प्रतिनिधींनी विद्यार्थ्यांची शैक्षणिक पात्रता, तांत्रिक ज्ञान, संवादकौशल्य, समस्या सोडविण्याची क्षमता, आत्मविश्वास आणि व्यक्तिमत्त्व या विविध बाबींच्या आधारे मुलाखती व निवड प्रक्रिया घेतली. विद्यार्थ्यांना थेट उद्योग प्रतिनिधींशी संवाद साधण्याची, स्वतःची कौशल्ये मांडण्याची तसेच उद्योगक्षेत्रातील अपेक्षा समजून घेण्याची महत्त्वपूर्ण संधी या माध्यमातून मिळाली.

रोजगार मेळाव्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये करिअरविषयी सकारात्मक दृष्टिकोन निर्माण झाला. शिक्षण पूर्ण केल्यानंतर उपलब्ध असलेल्या विविध रोजगाराच्या संधी, उद्योगक्षेत्रातील बदलत्या गरजा, आवश्यक तांत्रिक कौशल्ये आणि कंपन्यांच्या अपेक्षा यांची विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष माहिती मिळाली. त्यामुळे हा मेळावा केवळ रोजगाराची संधी उपलब्ध करून देणारा उपक्रम न ठरता विद्यार्थ्यांना उद्योगाभिमुख कौशल्यविकासाची दिशा देणारा महत्त्वपूर्ण उपक्रम ठरला.

1010648701

समर्थ शैक्षणिक संकुलाच्या वतीने विद्यार्थ्यांना शिक्षणासोबतच उद्योगांच्या गरजेनुसार आवश्यक कौशल्ये मिळावीत, यासाठी सातत्याने विविध प्रशिक्षण, कार्यशाळा, औद्योगिक भेटी, मार्गदर्शनपर कार्यक्रम आणि प्लेसमेंट उपक्रमांचे आयोजन केले जाते. उद्योगांच्या गरजा आणि विद्यार्थ्यांची कौशल्ये यामध्ये समन्वय साधून विद्यार्थ्यांना रोजगारासाठी सक्षम बनविण्यावर संस्थेचा विशेष भर आहे.

संस्थेचे अध्यक्ष वसंतराव शेळके, उपाध्यक्ष माऊलीशेठ शेळके, माजी जिल्हा परिषद सदस्य स्नेहलताताई शेळके आणि कॅम्पस डायरेक्टर राजीव सावंत यांनी रोजगार मेळाव्यास शुभेच्छा दिल्या.

रोजगार मेळाव्याच्या यशस्वी आयोजनासाठी समर्थ कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंटचे प्राचार्य डॉ. नवनाथ नरवडे, समर्थ इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसीचे प्राचार्य डॉ. कुलदीप रामटेके, समर्थ कॉलेज ऑफ फार्मसीचे प्राचार्य डॉ. संतोष घुले, समर्थ कॉम्प्युटर सायन्सचे प्राचार्य डॉ. उत्तम शेलार, प्रशासकीय अधिकारी प्रा. प्रदीप गाडेकर, डॉ. बिपिन गांधी,डॉ.सागर तांबे,प्रा. नितीन महाले तसेच या मेगा पूल कॅम्पस प्लेसमेंट ड्राईव्ह २०२६ च्या यशस्वी आयोजनामागे आमच्या समर्थ ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्सच्या ट्रेनिंग अँड प्लेसमेंट (T&P) सेलच्या सर्व सदस्यांचे अथक परिश्रम आहेत. नोंदणीपासून ते समन्वयापर्यंत, प्रत्येक टप्प्यावर त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर प्रा. सचिन पोखरकर यांनी केले, तर उपस्थित कंपनी प्रतिनिधी, विद्यार्थी, प्राध्यापक, विभागप्रमुख व सर्व मान्यवरांचे आभार प्रशासकीय अधिकारी प्रा. प्रदीप गाडेकर यांनी मानले.

1010560300

Related posts

पारगाव (शिंगवे) येथील अंगणवाडीतील बालकांना स्वातंत्र्यदिनानिमित्त शालेय साहित्याचे वाटप !!

Chief Editor

बंदी बांधवांच्या हातून साकारतोय बाप्पा; प्रायश्चित्तातून परिवर्तनाचा संदेश !!

Chief Editor

धामणी नगरीत श्रीकृष्ण जन्माष्टमी शताब्दी महोत्सव ; भव्य कीर्तन महोत्सवाचे आयोजन; नामवंत कीर्तनकारांची किर्तन सेवा होणार संपन्न !!

Chief Editor

Leave a Comment