
पंचनामा प्रतिनिधी – जारकरवाडी विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी मर्यादितची ६७वी वार्षिक सर्वसाधारण सभा संस्थेचे चेअरमन खंडुशेठ गेणभाऊ भोजने यांच्या अध्यक्षतेखाली खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली.
यावेळी संस्थेचे सचिव नवनाथ भिकन मंचरे यांनी वार्षिक अहवालाचे वाचन केले.
सभेत विविध विषयांवर सभासदांनी प्रश्न उपस्थित करून चर्चेत सहभाग घेतला. विशेषतः कर्जमाफीच्या विषयावर सभासदांमध्ये मोठ्या प्रमाणात चर्चा झाली. नियमितपणे वेळेत कर्जाची परतफेड करणारे सभासद कर्जमाफीपासून वंचित राहात असल्याबद्दल नाराजी व्यक्त करण्यात आली. शासनाच्या कर्जमाफीच्या धोरणाबाबत सभासदांमध्ये नाराजीचा सूर दिसून आला.

संस्थेच्या सन २०२४-२५ या वर्षाच्या भागभांडवलावर सभासदांच्या मागणीनुसार ११ टक्के लाभांश देण्याची घोषणा चेअरमन खंडुशेठ गेणभाऊ भोजने यांनी केली.
यावेळी भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे संचालक रामचंद्र ढोबळे, माजी चेअरमन शिवाजीराव भोजने, माजी संचालक विलास लबडे, माजी उपसरपंच सचिन टाव्हरे, संस्थेचे व्हा. चेअरमन बाळासाहेब लबडे, संतोष कापडी, काशिनाथ ढोबळे, सुभाष भोजने, ताराबाई काकडे, यमुनाबाई कापडी, योगिता लबडे यांच्यासह मोठ्या संख्येने सभासद उपस्थित होते.

सभा यशस्वीपणे पार पडल्याबद्दल संस्थेचे माजी व्हा. चेअरमन गणेश खुडे यांनी उपस्थितांचे आभार मानले. त्यानंतर सभासदांनी भोजनाचा आस्वाद घेतला. अध्यक्षांच्या परवानगीने सभा समाप्त झाल्याचे जाहीर करण्यात आले.




