सामाजिक

अन् अजितदादा पवार तमाशा कलावंत शांताबाई ला नम्रपणे नमस्कार करतात !!

img 20260201 wa0597
img 20260201 wa0597

(एक आठवण – अरुण खरात)
पंचनामा विशेष – एकेकाळी तमाशाचे फड गाजवणारी लावणीसम्राज्ञी शांताबाई कोपरगावकर या हलाखीच्या परिस्थितीत कोपरगावच्या बस स्थानकावरती भीक मागत असल्याची बातमी न्यूज चॅनल द्वारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यापर्यंत पोहोचली. त्यानंतर दिनांक 17 ऑगस्ट 2023 रोजी शिर्डी येथील शासन आपल्या दारी या कार्यक्रमात ज्येष्ठ तमाशा कलावंत शांताबाई कोपरगावकर यांना बोलावून त्यांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून पाच लाख रुपये मदत करण्याचे ठरले. शांताबाईला आणण्यासाठी वृद्धाश्रमात गाडी गेली शांताबाई आलया ही परंतु नाव पुकारून ही त्यांना स्टेज वरती येण्यासाठी उशीर झाला. उशीर का झाला कळले नाही परंतु इकडे पब्लिकमध्ये चुळबुळ चालू झाली. माननीय एकनाथ शिंदे, माननीय देवेंद्र फडणवीस हे नाही परंतु शिस्त व वक्तशीरपणा पाळणारे अजित दादा आता नक्कीच चिडतील हे आम्हास वाटले. दादा सारखे स्टेज वरती एन्ट्री होणाऱ्या दिशेकडे बघत होते… आणि काही वेळेनंतर शांताबाई ची स्टेज वरती एन्ट्री झाली. ती नेमकी येऊन अजित दादा पवार यांच्या समोर आडवी उभी राहिली. तारुण्यात आपल्या अदाकारीने महाराष्ट्रभर लोकांच्या टाळ्या व शिट्ट्या मिळवलेल्या शांताबाईला मात्र कोपरगावात वेडी म्हणून लोकांच्या शिव्या, लहान मुलांचे दगड खावे लागले आणि आज पुन्हा लोकांमधून आलेल्या टाळ्या शिट्ट्यांचा आवाज ऐकून घाबरलेल्या, बावरलेल्या शांताबाईला अजितदादा ने अगदी प्रेमाने हाताला धरून
आपल्याजवळ उभे केले. आणि पूर्वीचीच ओळख असल्यासारखे शांताबाई कडे बघून स्मितहास्य केले. माझ्या मनातील शंका दूर झाली. माननीय एकनाथराव शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजित पवार, पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, कोपरगावचे आमदार आशुतोष दादा काळे, माजी आमदार स्नेहलता ताई कोल्हे, खासदार सदाशिव लोखंडे यांच्या हस्ते शांताबाईंना पाच लाख रुपयांचा चेक प्रदान करण्यात आला. त्यानंतर अगदी नम्रपणे अजित दादा पवार ह्या “दादा” नावाच्या माणसाने दोन्ही हात जोडून शांताबाई कोपरगावकर यांना नमस्कार केला. एका लोककलावंतास महाराष्ट्राच्या तमाम जनतेच्या दादाने दोन्ही हात जोडून केलेल्या नमस्काराच्या प्रसंगाने मी भारावून गेलो. आणि क्षणात शांताबाई चा कोपरगावच्या बस स्टँड वरील भीक मागतानाचा प्रसंग आणि आज या दिग्गज नेत्यांच्या हस्ते होणारा मानसन्मान इथपर्यंतच्या प्रवासाचे चित्र डोळ्यासमोरून तरळून गेले. डोळ्यात आनंदाश्रू आले. अजित दादा यांच्या कृतीने माझ्या मनात त्यांच्याविषयी आदराचे स्थान निर्माण केले.
. आज दादांच्या निधनाची बातमी कळल्यापासून दादांचे त्यादिवशीचे स्टेजवरील नम्रपणाने वावरणे क्षणाक्षणाला आठवत आहे.
…..दादांना भावपूर्ण श्रद्धांजली….!
. ( अरुण खरात )
. चांदेकसारे, कोपरगाव

Related posts

भैरवनाथ विद्याधाम लोणी (धामणी) येथे शुक्रवार दि.२६ डिसेंबर २०२५ ते मंगळवार ३० डिसेंबर २०२५ पर्यंत संपन्न होणार विविध शालेय उपक्रम!!

Chief Editor

जवळे (ता.आंबेगाव) ग्रामपंचायत प्रशासनाची तत्परता ; मृत गाय आणि मेलेल्या कोंबड्यांची तत्काळ लावली विल्हेवाट !!

Chief Editor

लोणी (धामणी) येथे महाशिवरात्री निमित्ताने संपन्न होणार अखंड हरिनाम सप्ताह!!

Chief Editor

Leave a Comment