सामाजिक

नाशिक येथे उद्यापासून दि.२ फेब्रुवारी २०२६ ते ४ फेब्रुवारी २०२६ पर्यंत संपन्न होणार छायाचित्र प्रदर्शन !!

img 20260201 wa0319
img 20260201 wa0319

पंचनामा नाशिक प्रतिनिधी – डॉ.विनय ठकार यांचे स्मृतिप्रित्यर्थ नाशिक जिल्ह्यातील निसर्ग व वन्यजीव छायाचित्रकारांचा सहभाग असलेले छायाचित्र प्रदर्शन दि. ०२ ते ०४ फेब्रुवारी २०२६ दरम्यान कुसुमाग्रज प्रतिष्ठान गंगापूर रोड, नाशिक येथे आयोजित करण्यात आलेले आहे.

प्रदर्शनाचे उद्‌घाटन २ फेब्रुवारी २०२६ रोजी संध्या. ६ वाजता होणार असून या प्रदर्शनादरम्यान नांदुर मध्यमेश्वर अभयारण्य रामसर स्थळ सेवा गौरव पुरस्कार २०२६ (वर्ष तिसरे) रामेश्वरजी सारडा व सुनील वाडेकर यांना प्रदान करण्यात येणार आहे. कार्यक्रमास मा.दत्ता उगावकर, मा. हीरालाल चौधरी व मा. डॉ. प्रतिभा ठकार प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.

या प्रदर्शनाचे आयोजन ‘नांदुर मध्यमेश्वर अभयारण्य, वन्यजीव विभाग नाशिक’, ‘महाराष्ट्र पक्षिमित्र’, ’वेटलँड एज’ यानी केले आहे. छायाचित्र प्रदर्शनात नाशिकचे प्रसिद्ध छायाचित्रकार अनंत (बाळा) सरोदे, डॉ. अनिल माळी, सतिश गोगटे, शिरीष कालकोतवार, बाबासाहेब गायकवाड, डॉ. प्रशांत वाघ, मिलिंद देशमुख, अनिरुद्ध जाधव, संग्राम गोवर्धने, वेद शिंदे, दिलीप गिते, किशोर वडनेरे, प्रविण दौंड, राहुल वडगुले, सीमा तांगडपल्ली, सीमा पाटील, डॉ. प्रतिभा ठकार व इतर सहभागी होणार आहेत.

img 20260201 wa0321

सदर प्रदर्शन सकाळी १० ते रात्री ८ वाजेपर्यंत विनामुल्य खुले राहणार आहे. तरी याचा पक्षिप्रेमी नाशिककरांनी लाभ घ्यावा असे आवाहन पक्षिमित्र डॉ. अनिल माळी व अनंत (वय बाळा) सरोदे यांनी केले आहे.

Related posts

टॉप बँड इंडिया प्रायव्हेट लिमिटेड चाकण, पुणे येथे समर्थ आयटीआय व पॉलिटेक्निकच्या ३८ विद्यार्थ्यांची निवड !!

Chief Editor

लोणी (धामणी ) येथील लंकेवस्ती येथे जोमात आली काकडी !!

Chief Editor

इम्पॅक्ट पंचनामाच्या बातमीचा – पारगाव, दत्तात्रयनगर येथे बिबट्याला पकडण्यासाठी वन विभागाने लावला पिंजरा !!

Chief Editor

Leave a Comment