
पंचनामा प्रतिनिधी – समर्थ रुरल एज्युकेशनल इन्स्टिट्यूट संचलित समर्थ इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी व समर्थ कॉलेज ऑफ फार्मसी,बेल्हे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित वन्यजीव सप्ताह विविध शैक्षणिक,जनजागृतीपर,सर्जनशील व पर्यावरणपूरक उपक्रमांनी उत्साहात संपन्न झाला.
विद्यार्थ्यांमध्ये वन्यजीव संरक्षण,जैवविविधता संवर्धन,पर्यावरण संरक्षण,वैज्ञानिक दृष्टिकोन तसेच मानव–वन्यजीव सहअस्तित्वाची जाणीव निर्माण करणे हा सप्ताहाचा प्रमुख उद्देश होता.सप्ताहाच्या सांगता समारंभास वनपरिक्षेत्र अधिकारी,ओतूर चैतन्य कांबळे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.त्यांनी ‘जुन्नरमधील बिबट्या व्यवस्थापन ते जैवविविधता रक्षण : तांत्रिक दृष्टिकोन आणि वन प्रशासनाची भूमिका’ या विषयावर मार्गदर्शन केले.
बिबट्यांचा अधिवास,त्यांच्या संख्येचे शास्त्रीय मूल्यांकन,रेस्क्यू प्रक्रिया, मानव–बिबट्या संघर्षाची कारणे आणि संघर्ष टाळण्यासाठीच्या उपाययोजनांची माहिती त्यांनी दिली.बिबट्या आढळल्यास त्याच्या जवळ न जाणे,त्याला चिथावणी न देणे आणि तात्काळ वन विभागाला माहिती देणे,असे आवाहन त्यांनी केले.
सप्ताहदरम्यान ‘औषधी वनस्पती : औषधनिर्मितीतील महत्त्व व वनस्पती विविधता’ या विषयावर प्रा.डॉ.संजयकुमार रहांगदळे यांनी मार्गदर्शन केले. ‘सर्पविषापासून औषधनिर्मितीपर्यंत’ या विषयावर डॉ.सदानंद राऊत यांनी सर्पदंशाबाबतचे गैरसमज दूर करून वैज्ञानिक उपचारपद्धतीचे महत्त्व स्पष्ट केले.तसेच रमेश खरमाळे यांनी ‘मानवी जीवनातील पर्यावरणाचे महत्त्व’, रणजित शानभाग यांनी ‘सह्याद्रीतील पक्षी वैविध्य आणि त्यांचे संवर्धन’, तर तुषार पवार यांनी ‘भीमाशंकर वन्यजीव अभयारण्याची जैवविविधता आणि सहअस्तित्व’ या विषयांवर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
सप्ताहानिमित्त चित्रकला,पोस्टर सादरीकरण,वक्तृत्व,प्रश्नमंजुषा आणि रांगोळी अशा विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले.चित्रकला स्पर्धेत सिद्धेश लंके विजेता,तर सई जाधव उपविजेती ठरली.पोस्टर सादरीकरणात ऋतुजा कणसे व अनुराधा वाघ विजेत्या,तर प्रसाद डोईफोडे उपविजेता ठरला. वक्तृत्व स्पर्धेत वैष्णवी जाधव विजेती,तर वैष्णवी मोरे उपविजेती ठरली.प्रश्नमंजुषेत शिल्पा कऱ्हे व सुयश घाटकर यांनी विजेतेपद मिळविले.रांगोळी स्पर्धेत गौरी गुंजाळ व वैष्णवी चौधरी विजेत्या,तर स्वरांजली झिंजाड व वैष्णवी मोरे उपविजेत्या ठरल्या.
सांगता समारंभात विविध स्पर्धांतील विजेत्या व उपविजेत्या विद्यार्थ्यांना संस्थेचे विश्वस्त वल्लभ शेळके व वनपरिक्षेत्र अधिकारी चैतन्य कांबळे यांच्या हस्ते प्रमाणपत्र,सन्मानचिन्ह व एक रोपटे देऊन गौरविण्यात आले.
यावेळी वनपरिमंडळ अधिकारी सचिन सपकाळ,क्षेत्र अधिकारी विश्वराज साळुंखे,तसेच कैलास भालेराव,स्वप्निल केदारी व विशाल गुंड उपस्थित होते.
या उपक्रमाचे संस्थेचे अध्यक्ष वसंतराव शेळके,उपाध्यक्ष माऊलीशेठ शेळके,सचिव विवेक शेळके,माजी जिल्हा परिषद सदस्या स्नेहलताई शेळके,कॅम्पस डायरेक्टर प्रा.राजीव सावंत व प्रशासकीय अधिकारी प्रा.प्रदीप गाडेकर यांनी कौतुक केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. प्राची पडवळ यांनी केले.डॉ.सचिन दातखिळे यांनी प्रास्ताविकातून सप्ताहाच्या आयोजनामागील उद्देश स्पष्ट केला.
सप्ताहातील विविध उपक्रमांचा आढावा समर्थ इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसीचे प्राचार्य डॉ.कुलदीप रामटेके यांनी घेतला, तर समर्थ कॉलेज ऑफ फार्मसीचे प्राचार्य डॉ.संतोष घुले यांनी आभार मानले.



