सामाजिक

परतीचा मान्सून राज्यात धुमाकूळ घालणार ??

1011137397
1011137397

पंचनामा प्रतिनिधी – राज्यातील अनेक भागांमध्ये पावसाअभावी परिस्थिती गंभीर बनली असतानाच हवामानात पुन्हा मोठा बदल होण्याची शक्यता आहे. गेल्या काही दिवसांपासून काही भागांत उष्णता वाढताना दिसत आहे. त्यातच आता परतीच्या पावसाची चाहूल लागली असून, राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे दुष्काळाच्या संकटात असलेल्या भागांना काहीसा दिलासा मिळण्याची शक्यता आहे.

‘या’ भागांमध्ये पावसाचा इशारा

भारतीय हवामान विभागाने कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही भागांसाठी पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. पुणे घाटमाथा, नाशिक घाटमाथा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड, ठाणे, मुंबई, नाशिक, सोलापूर, बीड, धाराशिव, जळगाव, नंदुरबार आणि धुळे या भागांना पावसाचा इशारा देण्यात आला आहे. काही ठिकाणी अतिमुसळधार पाऊस होण्याची शक्यताही व्यक्त करण्यात आली आहे.

ईशान्य बंगालच्या उपसागरात आणि आग्नेय बांगलादेशाजवळ कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. त्याचा परिणाम पावसाच्या हालचालींवर होण्याची शक्यता आहे. दरम्यान, मॉन्सूनने दिल्ली, पंजाब, राजस्थान, हरियाणा, गुजरात आणि उत्तर प्रदेशातील काही भागांतून माघार घेतली आहे.

पावसाअभावी रब्बी पिकांचीही चिंता

यंदाच्या मॉन्सून हंगामात देशात दीर्घकालीन सरासरीच्या ८७ टक्के, तर महाराष्ट्रात ८१ टक्के पाऊस झाल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे. कमी पावसामुळे शेतीपिकांचे नुकसान झाले असून पिण्याच्या तसेच जनावरांच्या पाण्याचा प्रश्नही गंभीर झाला आहे.

दरम्यान, प्रशांत महासागरातील एल निनोच्या प्रभावामुळे यंदाच्या मॉन्सूनवर परिणाम झाल्याचे हवामान विभागाने नमूद केले आहे. मॉन्सूनोत्तर काळात देशाच्या बहुतांश भागांत सरासरीपेक्षा कमी पावसाची शक्यता असल्याने रब्बी हंगामाबाबतही चिंता वाढली आहे. परतीचा पाऊस चांगला झाल्यास काही भागांतील पाणीटंचाई कमी होण्यास मदत होऊ शकते.

92f4d25e 9686 4a0e aeae dca8fbad0e88 1 all 390586

Related posts

प्रजापती बम्हाकुमारी ईश्वरी विश्वविद्यालय पारगाव (शिंगवे) येथे व्यसनमुक्ती अभियान संपन्न !!

Chief Editor

गुरुकुलच्या विद्यार्थ्यांनी अनुभवले आधुनिक तंत्रज्ञानाचे प्रात्यक्षिक धडे !!

Chief Editor

समर्थ शैक्षणिक संकुलात निर्भय कन्या अभियानाचे आयोजन !!

Chief Editor

Leave a Comment