सामाजिक

आंबेगाव तालुक्यातील काठापूर बुद्रुक गावातील तरुणांनी जपली ७० वर्षांची नाट्य परंपरा!!

img 20260224 wa0347
img 20260224 wa0347

पंचनामा पारगाव (शिंगवे) प्रतिनिधी – आंबेगाव तालुक्यातील काठापूर बुद्रुक गावची ७० वर्षाची नाट्य परंपरा गावातील तरुणांनी एकत्र येत जोपासली असुन या वर्षी दिवटा हे नाटक सादर केलं.या नाटकाने रसिकांची मने जिंकली.

काठापूर बुद्रुक येथील रंगधारा नाट्य मंडळाच्या माध्यमातून गेले ७० वर्ष गावच्या यात्रेच्या निमित्ताने नाटक सादर करण्याची परंपरा आहे.आजही गावातील तरुणांनी एकत्र येत ही परंपरा जोपासत नाटक सादर केलं. रंगधारा नाट्य मंडळाची स्थापना ७० वर्षापुर्वी झाली.या संस्थेच्या माध्यमातून दरवर्षी गावच्या यात्रेच्या निमित्ताने नाट्य प्रयोग सादर केला जातो.

काठावर बुद्रुक येथील मुंबई स्थित असणारे अनेक नागरिक एकत्र येऊन दरवर्षी आपल्या गावात नाटक सादर करतात. गेली ७० वर्ष ही परंपरा अखंडपणे सुरू आहे.याही वर्षी गावातील तरुणांनी एकत्र येत रामदास करंडे लिखित दिवटा हे नाटक सादर केले.

यावेळी सादर झालेल्या नाटकात विजय करंडे, रवींद्र करंडे,शिवाजी करंडे, गणेश हिंगे, राजेंद्र करंडे, शशिकांत वाघ, रामदास सैद यांनी भुमिका साकार केल्या.

यावेळी भिमाशंकर साखर कारखान्याचे संचालक बाळासाहेब घुले, अशोक करंडे, विशाल करंडे, अमोल करंडे,निवृत्ती करंडे, शंकर करंडे, नरहरी करंडे,नथु करंडे,बन्सी कांबळे, कैलास करंडे आदी पदाधिकारी उपस्थित होते.

fb img 1771121541695

Related posts

उन्हाळ्याची चाहूल लागताच माठांची मागणी वाढली; ‘गरीबांचा फ्रीज’ पुन्हा घराघरांत पोहचणार !!

Chief Editor

हजार लीटर दूधात शाम्पू, दूध पावडर आणि केमिकलचं ५०० लीटर पाणी;भेसळ खोरांचा पर्दाफाश !!

Chief Editor

उष्णतेचा कहर कायम; पण आजपासून पावसाची शक्यता !!

Chief Editor

Leave a Comment