सामाजिक

लोणी (धामणी ) गावच्या उपसरपंचपदी राजेंद्र वाळुंज यांची बिनविरोध निवड !!

img 20260223 wa0797

पंचनामा लोणी (धामणी) प्रतिनिधी – आंबेगाव तालुक्यातील सर्वार्थाने प्रगतशील गाव म्हणून ओळख असणाऱ्या लोणी (धामणी) गावच्या उपसरपंचपदी राजेंद्र वामन वाळुंज यांची बिनविरोध निवड झाली.

img 20260223 wa0805

आंबेगाव तालुक्यातील पूर्व भागातील लोणी गाव ही एक मोठी ग्रामपंचायत असून लोणी गावाची बाजारपेठ संपूर्ण आंबेगाव व शिरूर तालुक्यातील लगतच्या गावात प्रसिद्ध आहे. गावातील बारमाही पिण्याच्या व शेतीच्या पाण्याचा प्रश्न, असंतुलित विजेचा प्रश्न तसेच सुधारित रस्ते यासाठी मी पुढील काळात काम करणार असल्याचे नवनिर्वाचित उपसरपंच राजेंद्र वाळुंज यांनी पंचनामाशी सांगितले.

या निवडीच्या वेळेस लोकनियुक्त सरपंच डॉ. सावळाभाऊ नाईक, ग्रामपंचायत सदस्य राहुल आढाव, प्रकाश गायकवाड, प्रदीप कोचर, स्वातीताई वाळुंज, आदिकाताई खोमणे, मंगल ताई गायकवाड, पुष्पाताई रोकडे हजर होते.

img 20260223 wa0799

मा.सरपंच दिलीप वाळुंज यांनी नवनिर्वाचित उपसरपंच राजेंद्र वाळुंज यांचे अभिनंदन केले व पुढील राजकीय काळासाठी शुभेच्छा दिल्या.

याप्रसंगी लोणी गावातील ग्रामस्थ उपस्थित होते. त्यांच्या प्रमुख उपस्थितीत नूतन उपसरपंच वाळुंज यांचा सन्मान करण्यात आला.

fb img 1771121534243

Related posts

शुगर इथेनॉल बायोएनर्जी कॉन्फरन्स मध्ये शुगर इंडस्ट्रीज परिवार चा गौरव

Chief Editor

मान्सून अपडेट – महाराष्ट्रात पावसाचा जोर कधी वाढणार ? हवामान विभागाचा मोठा अंदाज; ‘या’ तारखेनंतरच बरसणार धारा !!

Chief Editor

‘इंडस्ट्री 4.0’च्या युगात विद्यार्थ्यांना करिअरच्या नव्या संधी; समर्थ कॉलेजमध्ये औद्योगिक ऑटोमेशनवर मार्गदर्शन

Chief Editor

Leave a Comment