सामाजिक

लोणी (धामणी) येथील विजया ज्ञानेश्वर गायकवाड यांच्या हिमतीची दाद द्यावी तितकी थोडकी; चोरट्यांचा गळ्यातील गंठण हिसकावण्याचा प्रयत्न हिमतीने केला असफल !!

1009478982
1009478982

पंचनामा प्रतिनिधी – लोणी ( ता.आंबेगाव ) येथील बेल्हा-जेजुरी महामार्गावर लोणी पाबळ लगत असताना असणाऱ्या दुकानात बसलेल्या विजया ज्ञानेश्वर गायकवाड (वय-५५वर्ष) या महिलेच्या गळ्यातील अडीच तोळ्याचा सोन्याचा गंठण हिसकावण्याचा प्रयत्न मोटर सायकल वरून आलेल्या चोरट्याने केला.

बुधवार( दि.१३ रोजी) दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास मोटर सायकल वरून आलेल्या दोन चोरट्यांनी तंबाखूची पुडी घेण्याच्या बहाना करून दुकानाजवळ येऊन गंठण ओढण्याचा प्रयत्न केला असता सदर महिलेने जोरदार प्रतिकार केल्याने चोरटा मोटर सायकल वरून पळून गेला. सदर दुसरा चोरटा गाडीवर बसून गाडी सुरु करून होता. आरडा ओरडा होताच चोरटे पळून गेले. दुकानदार महिलेने चोरट्याची शर्टची कॉलर धरून जोरदार प्रतिकार केल्यामुळे दागिना तिथेच टाकून चोरटे पाबळच्या दिशेने पळून गेले.चार साडेचार लाख रुपयांची चोरी होता होता वाचली.

सदर घटनेची माहिती कळताच त्वरीत घटनास्थळी पारगाव-कारखाना पोलीस स्टेशनचे बीट अंमलदार दत्ता जठर व पोलीस अंमलदार संजय साळवे,पोलीस पाटील संदीप आढाव, खडकवाडीचे माजी सरपंच अनिल डोके यांनी भेट देऊन परिस्थिती पाहणी केली.

नागरिकांनी किमती दागिने घालताना काळजी घ्यावी,एकांटी घर असणाऱ्या नागरिकांनी विक्रेते वगैरे आलेल्या लोकांपासून सावध राहावे असे आवाहन पारगाव कारखाना पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन कांडगे यांनी केले आहे.

लोणी (ता.आंबेगाव ) येथे घटनास्थळी दाखल दाखल झालेले पोलिस कर्मचारी.

fb img 1774661449199

Related posts

समर्थ मध्ये कौशल्य विकास कार्यशाळा उत्साहात संपन्न !!

Chief Editor

बांधकामासाठी वापरण्यात येणाऱ्या लोखंडी प्लेटा चोरी करणाऱ्या सराईत गुन्हेगारास पारगाव (कारखाना) पोलिसांनी जेरबंद करून एकुण ३७ प्लेटा केल्या जप्त;पारगाव पोलीसांची उत्तम कमगिरी !!

Chief Editor

धामणीच्या खंडोबा मंदिरात गुरुवारी संपन्न होणार दुसरा चंदनउटी सोहळा !!

Chief Editor

Leave a Comment