सामाजिक

जवळे ग्रामपंचायतीची जिल्हा परिषद सी.ई.ओ कडून पाहणी !!

img 20260205 wa0164
img 20260205 wa0163

पंचनामा पारगाव (शिंगवे) प्रतिनिधी – आंबेगाव तालुक्यातील सर्वार्थाने प्रगतशील गाव म्हणून ओळख असणाऱ्या व ग्रामपंचायतच्या माध्यमातून विविध नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात अग्रेसर असणाऱ्या जवळे गावात मुख्यमंत्री पंचायत राज अभियान निमित्त ग्रामपंचायत स्तरावर राबविण्यात येत असलेल्या विविध उपाययोजनांची पाहणी करण्यासाठी जिल्हा परिषद पुणे या ठिकाणाहून मा.श्री.भूषण जोशी उपमुख्य कार्यकारी अधिकारी ( पंचायत) जिल्हा परिषद पुणे, समवेत पंचायत समिती आंबेगाव गटविकास अधिकारी अर्चना कोल्हे, विस्तार अधिकारी रंगनाथ हुजरे यांच्या वतीने ग्रामपंचायत ने केलेल्या विविध कामांचा आढावा घेण्यात आला.

यामध्ये ग्रामपंचायत कार्यालय, ग्रामपंचायत मध्ये सुरू असलेली ऑनलाइन प्रणाली,नवनवीन उपक्रम, वृक्ष संवर्धन, दिशादर्शक फलक, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जवळे येथील विद्यार्थ्यांचे अध्यापन याचा आढावा घेण्यात आला.तसेच अंगणवाडी या ठिकाणी असणाऱ्या सर्व सोयी सुविधांची पाहणी करण्यात आली.

img 20260205 wa0164

यावेळी गावच्या आदर्श सरपंच सौ.वृषालीताई उत्तम शिंदे पाटील,ग्रामपंचायत अधिकारी शिला साबळे, बचत गट प्रतिनिधी चंद्रकला गायकवाड,शालन सोनवणे,(अंगणवाडी सेविका) सुनंदा शिंदे (आशा वर्कर) उपस्थित होते.

fb img 1769478999823

Related posts

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या वाढत्या इंधन खर्चावर नियंत्रण मिळवण्यासाठी ‘इंधन बचत म्हणजेच इंधन निर्मिती’ संकल्पना राबवली जाणार – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

Chief Editor

लाखणगावच्या श्वेता दादाभाऊ पाटील ची J.S.W या कंपनीत अभियंतापदी निवड !!

Chief Editor

आंबेगाव तालुक्यातील पहाडदरा येथे पाण्याचा टँकर सुरू !!

Chief Editor

Leave a Comment