सामाजिक

हिंदू-मुस्लिम ऐक्याचे प्रतिक असलेल्या वडगावपीर येथील श्री पिरसाहेब यात्रा उत्सव बुधवार दि.११ मार्च ते शुक्रवार दि.१३ मार्च २०२६ रोजी संपन्न होणार !!

img 20260310 wa0554
img 20260310 wa0555

पंचनामा प्रतिनिधी – हिंदू-मुस्लिम ऐक्याचे प्रतिक असलेल्या वडगावपीर (ता.आंबेगाव ) येथील श्री पिरसाहेब यात्रा उत्सव बुधवार (दि:११) ते शुक्रवार (दि:१३ ) असे तीन दिवस संपन्न होणार आहे.

बुधवार ( दि :११) रोजी सांयकाळी सहा ते रात्री दहा या वेळेत संदल कार्यकम होणार असून या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने हिंदू-मुस्लिम बांधव उपस्थित असतात असे हजरत दावल मलिक दर्गा शरिफ ट्रस्टिजच्या वतीने हनिफ मुजावर यांनी सांगितले आहे.

गुरूवार (दि:१२ ) रोजी सकाळी ८ वाजता देवास शेरणी व दंडवते व शेरणी वाटप तसेच सकाळी सात ते सायंकाळी सात वाजता बैलगाड्याच्या भव्य शर्यती संपन्न होणार आहेत.बैलगाड्यांसाठी एकूण इनाम ३,१०,२३१/- रुपये असून, प्रथम क्रमांकासाठी ७५,५५५-/ रुपये, द्वित्तीय क्रमाक-६५,५५५/ रुपये, तृत्तीय क्रमाक-५५,५५५/ रुपये, चतूर्थ क्रमाक-३५,५५५/ रुपये, इनाम असून,फायनलसाठी प्रथम क्रमांक-२५,००१/ रुपये,द्वित्तीय क्रमाक-१५,१०१/ रुपये,तृतीय क्रमांक-११,००१/ रुपये, घाटाचा राजा यासाठी एक भव्य चषक,वीस फूटावर कांडे-५,००१/ रुपये
तसेच पहिल्यात पहिला येणा-या गाड्यास -७००१/ रुपये, दुसर्यात पहिला येणार्या गाडयास-५००१/ रुपये, तिसर्यात पहिल्या येणार्या गाडयास-४००१/ रुपये,चौथ्यात पहिला येणार्या गाडयास-३००१/ रुपये अशी बक्षिसे देण्यात येणार आहेत.

तसेच सतत तीन वर्ष प्रथम येणाऱ्या गाड्यास (सन २०२४ ते २०२६) गाड्यास पाच दुचाकी किंवा रोख रक्कम रुपये ३,५१,००१/- रुपयांचे बक्षीस दिले जाणार आहे.

गुरूवार (दि:१२ ) रोजी रात्री ९ वाजता राष्ट्रपती सुवर्णपदक विजेत्या विठाबाई भाऊ (मांग ) नारायणगावकर यांचा लोकनाटय तमाशाचा कार्यक्रम होईल.

शुक्रवार (दि.१३) रोजी दुपारी ५ ते ७ वाजेपर्यंत विठ्ठल मैदान येथे भव्य कुस्त्यांचा जंगी आखाडा होईल.या कार्यक्रमासाठी विविध क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित राहाणार आहेत.या सर्व कार्यक्रमाचे आयोजन व नियोजन समस्त ग्रामस्थ वडगावपीर-मांदळेवाडी,मुंबई,पुणे व शिवछत्रपती ग्रामविकास प्रतिष्ठान व सर्व मंडळे यांनी केले आहे असे ग्रामस्थांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.

fb img 1771121534243

Related posts

संत निरंकारी मिशन-राजेवाडी शाखेच्या वतीने आयोजित रक्तदान शिबिरात ३७४ जणांनी केले मानवतेप्रती रक्तदान…

Chief Editor

मंचर (ता.आंबेगाव) एस.टी.बस स्थानकाचा होणार कायापालट; ५ कोटी ३६ लाखांच्या विकासकामांना प्रशासकीय मंजुरी;मा.मंत्री दिलीपरावजी वळसे पाटील यांच्या पाठपुराव्याला मोठे यश !!

Chief Editor

धामणी (लोणी) येथे संपन्न झाला खंडोबा-म्हाळसाईचा शाही विवाह सोहळा !!

Chief Editor

Leave a Comment