सामाजिक

माळरानावर बहरतेय कलिंगडाची शेती; धामणी गाव पुसू पाहते आहे आपली दुष्काळी ओळख !!

fb img 1777008291034
fb img 1777008291034

पंचनामा विशेष – आंबेगावच्या पूर्व भागातील दुष्काळी गाव म्हणून ओळख असलेले धामणी हे गाव, खरतर दुष्काळ हा कायमच पाचवीला पुजलेला !! परंतु गेल्या दोन ते तीन वर्षांपासून येथील परिस्थिती बदलत आहे.धामणी गावातील शेतकऱ्यांनी समूहाने एकत्र येऊन उपसाजलसिंचन योजनेच्या माध्यमातून वैयक्तिक खर्चातून शेती बारमाही बागायत करण्याचा निर्णय घेतला आणि आता येथील परिस्थिती हळूहळू बदलत आहे.

धामणी गावातील शेतकरी आपल्या माथ्यावर दुष्काळी म्हणून असलेला शिक्का पुसण्यात यशस्वी होत आहे.धामणी येथील युवा शेतकरी श्री. शांतारामशेठ जाधव यांनी पारंपरिक पिकांना फाटा देऊन या वर्षी पहिल्यांदाच आपल्या शेतामध्ये कलिंगड, काकडी ही पिके घेण्याचा निर्णय घेतला त्यांचा हा प्रयोग यशस्वी होताना दिसत असून भरघोस अस उत्पन्न मिळणार आहे.

fb img 1774661444136

सध्या उन्हाचा तडाखा वाढला असून बाजारामध्ये कलिंगड आणि काकडी या दोन्ही फळांना चांगली मागणी असल्यामुळे बाजारभाव देखील चांगला आहे त्यामुळे शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधान दिसत आहे त्याचप्रमाणे आपण घेतलेल्या कष्टाच चीज होताना दिसत आहे.


✍️ संदिप ( विशाल) तांबे पाटील..

Related posts

लेण्याद्री येथे ऐतिहासिक स्थळे संवर्धन कार्यशाळा संपन्न !!

Chief Editor

चिमुकल्यांचे बालपण स्क्रीनच्या कैदेत, खेळण्याच्या वयात वाढतेय मोबाईलचे व्यसन..

Chief Editor

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पारगाव (शिंगवे) येथील चिमुकल्या शालेय विद्यार्थ्यांनी बाजाराच्या माध्यमातून घेतले व्यवहार ज्ञानाचे धडे !!

Chief Editor

Leave a Comment