सामाजिक

संतोषचा प्रेरणादायी पत्रकारितेचा प्रवास !!

img 20260424 wa0630
img 20260424 wa0630

आंबेगाव तालुका पत्रकार संघाचे मा.अध्यक्ष,जेष्ठ पत्रकार श्री.संतोषजी वळसे पाटील यांना शरद बँकेचे संचालक अजय घुले यांनी अभिनव पद्धतीने दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा!!

पंचनामा विशेष – संतोषचा पत्रकारिता क्षेत्रातील प्रवास खरोखरच सर्वांना थक्क करणारा आहे. आज त्याचा वाढदिवस—या निमित्ताने त्याच्या आयुष्याचा हा प्रवास आठवताना अभिमान वाटतो.

निरगुडसरच्या प्राथमिक आरोग्य केंद्रातच संतोषचा जन्म झाला. योगायोगाने त्या दिवशीच गावची यात्रा होती. त्या वेळी आरोग्य केंद्रात काम करणारे सुखदेव जाधव हॉटेलमध्ये येऊन आनंदाची बातमी दिली—“तुला भाऊ झाला आहे.” हे ऐकून माझ्याजवळ असलेल्या बहीण रंजना आणि बेबी यांचा आनंद गगनात मावेनासा झाला.

लहानपणापासून आम्ही सर्व भावंडे हॉटेलमध्ये काम करत होतो. इयत्ता दहावीनंतर संतोषसमोर दोन पर्याय होते—एसटी महामंडळात चालक होणे किंवा लष्करामध्ये भरती होणे. मात्र आईला हे मान्य नव्हते. बराच विचार करून त्याच्या भवितव्याचा मार्ग शोधत होतो. अवसरी दूध केंद्रात मी अधिकारी असल्यामुळे त्याला नोकरी देणे सहज शक्य होते, पण एकाच ठिकाणी दोघांनी काम करणे योग्य वाटले नाही, म्हणून तो विचार सोडून दिला.

दरम्यान, बातम्यांसाठी फोटोची गरज भासत होती आणि मंचरमध्ये फक्त दोनच स्टुडिओ होते. हीच संधी ओळखून आम्ही “संगम फोटो स्टुडिओ” सुरू केला. त्याआधी संतोषला राजगुरुनगर येथे माझे जिवलग मित्र एकनाथ सांडभोर यांच्याकडे फोटोग्राफीचे प्रशिक्षण दिले. त्याने मनापासून प्रशिक्षण पूर्ण केले.

fb img 1774661444136

फोटोग्राफी आणि व्हिडिओ शूटिंगमध्ये संतोषला विशेष आवड निर्माण झाली. मी स्टुडिओमध्ये बातम्या लिहीत असताना तो फोटो काढून मदत करत होता. एक-दोन वेळा तो माजी आमदार (स्व.) दत्तात्रय वळसे पाटील यांच्यासोबत ‘नवाकाळ’चे संपादक खाडीलकर यांना भेटायला गेला. खाडीलकर सरांना आमच्या घरी बनणाऱ्या खास पदार्थांची खूप आवड होती—लसणाची मिरची, आळूच्या वड्या, बिबड्या. माझी आई (स्व.) चंद्रभागा पहाटे उठून हे सर्व प्रेमाने तयार करून संतोषकडे देत असे.

दादांसोबत तो लोणावळ्याजवळील कार्ला येथे निसर्गोपचार घेत असलेल्या खाडीलकर सरांना भेटला. त्याच भेटीत त्यांनी संतोषची ‘नवाकाळ’च्या वार्ताहर म्हणून नियुक्ती केली. त्या काळात ‘नवाकाळ’ची मोठी क्रेझ होती—अग्रलेखासाठी ओळखले जाणारे हे वृत्तपत्र. त्या वेळी आंबेगाव तालुक्यात पत्रकारितेत मी आणि संतोष असे दोघेच होतो. नंतर प्रताप हिंगे आणि रमेश जाधव यांनीही या क्षेत्रात प्रवेश केला.

आज संतोष तीन-चार नामांकित वृत्तपत्रांमध्ये कार्यरत आहे. प्रत्येक वृत्तपत्रासाठी वेगळा दर्जेदार मजकूर देणे ही मोठी कसरत असते, पण तो ती समर्थपणे पार पाडतो. आजही पत्रकारितेची मूल्ये जपत प्रामाणिकपणे काम करत आहे, याचा मला मनापासून अभिमान आहे.

संतोषला वाढदिवसानिमित्त मनःपूर्वक शुभेच्छा—त्याचा हा प्रेरणादायी प्रवास असाच यशाच्या उंच शिखरावर पोहोचत राहो! अशी परमेश्वराचे प्रार्थना.

img 20260424 wa0631

अजय घुले संचालक शरद सहकारी बँक

Related posts

प्रभारी अधिकारी श्री.सचिन कांडगे यांनी पारगाव (कारखाना) पोलिस ठाण्याचा पदभार स्वीकारला !!

Chief Editor

बांधकामासाठी वापरण्यात येणाऱ्या लोखंडी प्लेटा चोरी करणाऱ्या सराईत गुन्हेगारास पारगाव (कारखाना) पोलिसांनी जेरबंद करून एकुण ३७ प्लेटा केल्या जप्त;पारगाव पोलीसांची उत्तम कमगिरी !!

Chief Editor

आदर्शगाव गावडेवाडी येथे अखंड हरिनाम सप्ताहात मासवडीचे जेवण;तीन हजार भाकरींचे नियोजन ;महिलांसाठी वीस पैठणींचा लकि ड्राॅ !!

Chief Editor

Leave a Comment