सामाजिक

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खडकी ( पिंपळगाव) येथे संपन्न झाला चिमुकल्या विद्यार्थ्यांचा आठवडे बाजार !!

img 20260307 wa0535

पंचनामा प्रतिनिधी – आंबेगाव तालुक्यातील ऐतिहासिक स्थळ म्हणून ओळख असणाऱ्या खडकी (पिंपळगाव) गावातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येथे बाल आनंद मेळाव्या अंतर्गत सर्व वर्गाच्या चिमुकल्यांचा आठवडे बाजार आयोजित करण्यात आला होता.

img 20260307 wa0526

पुण्यश्लोक आहिल्याबाई होळकर यांच्या कार्याने ऐतिहासिक वारसा लाभलेले असे प्रसिद्ध खडकी गाव. खडकी गावातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खडकी पिंपळगाव येथे शनिवार दिनांक 07/03/2026 रोजी पुणे जिल्हा परिषद पुणे, पंचायत समिती आंबेगाव तसेच जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खडकी (पिंपळगाव) यांच्या संयुक्त विद्यमाने बाल आनंद मेळावा अंतर्गत आठवडे बाजार या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.कार्यक्रमाचे उद्घाटन श्री.दत्तात्रय जिजाभाऊ बांगर (सरपंच)व ज्येष्ठ नागरिक मारुतीशेठ रामकृष्ण वाबळे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले.

मुलांनी भाजीपाला,फळे, चिंच,कांदा,लिंबू, बटाटे,आले, मेथी, कोथिंबीर अशा जीवनावश्यक वस्तूंचे वस्तू विक्रीसाठी आणल्या होत्या तर काही मुलांनी इडली सांबर, वडापाव स्टॉल भेळ,चटपटी यासारखे खाण्याचे पदार्थ अशी पदार्थांची मांदियाळी पाहावयास मिळाली. शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष, उपाध्यक्ष, सदस्य सखी सावित्री मंच अध्यक्ष, उपाध्यक्ष, सदस्य विद्यार्थी भौतिक सुविधा व विकसन समिती अध्यक्ष, उपाध्यक्ष सदस्य व महिला तक्रार निवारण समिती अध्यक्ष, उपाध्यक्ष व सदस्य यांनी तसेच ग्रामस्थांनी मनसोक्त खरेदी केली.

img 20260307 wa0524

शेवटी मुलांकडून आजच्या आठवडी बाजारात झालेली त्यांची उलाढाल नफा झाला की तोटा याचा अंदाज घेण्यात आला. आजच्या आठवडी बाजारात जवळपास 5000 रुपये इतकी उलाढाल झाल्याची माहिती शाळेचे मुख्याध्यापक श्री विजय एकनाथ थोरात यांनी दिली.

कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी शालेय व्यवस्थापन समिती,महिला तक्रार निवारण समिती,सखी सावित्री समिती मंच,विद्यार्थी सुरक्षा भौतिक विकसन समिती तसेच ग्रामस्थ यांनी विशेष प्रयत्न केले.

img 20260307 wa0522
img 20260307 wa0532
fb img 1771121534243

Related posts

पारगाव (शिंगवे ) गावात जपली जातेय वीर देवाची शेकडो वर्षांची परंपरा !!

Chief Editor

धामणी (लोणी) येथे संपन्न झाले दत्तात्रय गोविंदराव वळसे पाटील महाविद्यालयाचे श्रमसंस्कार शिबिर !!

Chief Editor

जवळे (ता.आंबेगाव) येथे महिलांसाठी कौशल्य विकास योजने अंतर्गत आरी प्रशिक्षण संपन्न !!

Chief Editor

Leave a Comment