सामाजिक

पंचनामा विशेष – नाते कलेचे त्या रक्ताशी !!

img 20260401 wa0569

साभार लेख – शाहीर खंदारे

पंचनामा प्रतिनिधी – कै.बुवासाहेब फुलचंद अवघडे मु.पो. बारामती,ता.बारामती,जि.पुणे होय.
आईचे नाव यल्लुबाई असून त्यांना दोन मुलं आहेत.कै.बुवासाहेब हे गायक अष्टपैलू सोंगाड्या आणि स्वतः गाणे रचून समाजप्रबोधन करणारे कलावंत होते.

बुवा साहेबांना अवघ्या सहा वर्षातच कलेचा छंद लागला. आपणही स्टेजवर काम करावे, मोठे कलावंत व्हावे ही इच्छा मनात बाळगून देवाची करणी नारळात पाणी,अगदी तसेच घडलं !!
कै.बुवा साहेबांनी गंगुबाईची खानावळ,पंढरीची वारी,आंधळा मारतोय डोळा,दुर्दैव माझ्या ताईचे, बाया देखणी जना लावला चुना,दारू सोडा संसार जोडा,लखोजी भोसला, प्रेमासाठी फाशी ,अलीबाबा चाळीस चोर आणि चंद्रमोहन, इत्यादीवगनाट्यत काम करून एक नंबरच्या भूमिका गाजवल्या.

एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे दारू सोडा संसार जोडा !! ही कॅसेट संपूर्ण महाराष्ट्रात गाजली आणि सुमित कॅसेट कंपनी पुणे यांनी महाराष्ट्रभर ही कॅसेट पोहोचवली !!खरोखर या कॅसेटने दारूबंदीचे समाज प्रबोधन केले याच कॅसेट मुळे त्यांच्या कलेची पावती त्यांना महाराष्ट्रभर मिळत गेली.

img 20260401 wa0570

ते एक अस्सल मराठी सोंगाड्या होते, गायक होते आणि वगनाट्यातही अष्टपैलू भूमिका करत होते .त्यांचा आवाज ,त्यांच्या बोलण्याची ढब ,अभिनय ,बोलण्याचा चढ उतार ,शब्दांची फेक आणि अदाकारी ही काही वेगळीच !! त्यांची राहणी साधी असून कलाकारावरील प्रेम ,रसिकांची आवड ,आणि तमाशा कलेचा बाज अतिशय चांगला होता.त्यांनी तमाशा स्टेजवर जवळजवळ 44 वर्ष रसिकांची सेवा केली आणि ते एके दिवशी हा मायारूपी पिंजरा खाली करून परलोकी निघून गेले.खरंच असे अष्टपैलू कलावंत पुन्हा होणे नाही.

बुवासाहेब वारल्यानंतर त्यांची पत्नी रूपाली ताई ही सुद्धा एक अष्टपैलू कलावंत होती.ती स्वतः गायिका असून एक चांगल्या प्रकारची लावणी सम्राज्ञी आहे.त्यांनी सुद्धा आपल्या पतीच्या बरोबर
वगनाट्यत,चांगल्या भूमिका करून रसिकांची मने ताब्यात घेतली.

रूपाली अकरा वर्षाची असताना तमाशास्टेज वरील सरस्वती प्रसन्न झाली, एवढेच नाही तर 2025 झाली.खासदार श्रीनिवास पाटील साहेब आणि लीला गांधी यांच्या हस्ते पठ्ठे बापूराव हा पुरस्कार पटकावला.त्यांनीही 30 ते 32 वर्ष रसिकांची मनोभावी सेवा करीत आहेत.

रूपा ताईंचा ही आवाज अतिशय सुंदर असून, गायनाची ढबही फार चांगली आहे.त्या स्टेजवर येताच ,रसिक टाळ्यांच्या व शिट्ट्यांच्या गजरात त्यांचे स्वागत करतात, हे अगदी नक्की …..
रूपाताईला परमेश्वराने एक आवाजाची देणगीच बहाल केलेली आहे असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही.त्या सुद्धा ताल ,स्वर आणि लई या त्रिवेणी संगमाने गायन कामासाठी तयार आहेत. ती सुद्धा 30 ते 32 वर्ष रसिकांची सेवा करीत आहेत.

बुवासाहेब वारल्यानंतर त्यांनी आपल्या दोन मुलांना छातीशी धरून, आणि आपल्या पतीच्या पायावर पाय ठेवून रसिकांची सेवा करावी हा संकल्प मनात करून आजही कै. बुवासाहेब यांच्या नावाने तमाशा फड चालू आहे आणि हा तमाशा फड अतिशय कष्ट करून उभा केला असे रूपा ताईंच्या तोंडातून उद्गार निघाले.

खरंच अशा महान कलावंतांचं अभिनंदन केलं पाहिजे ,त्यांच्या हातून रसिकांची सेवा घडो ,त्यांना उदंड आयुष्य लाभो, आणि त्यांच्या तमाशाचे नाव महाराष्ट्रभर झळकत राहो हीच माते जगदंबेच्या चरणी प्रार्थना करतो …..

लेखक – शाहीर खंदारे.
ता.नेवासा ..8605558432

fb img 1773887073740

Related posts

लोणी (धामणी ) मध्ये भगवान महावीर कल्याणक जयंती संपन्न !!

Chief Editor

समर्थ फार्मसी,बेल्हे मध्ये राज्यस्तरीय प्रश्नमंजुषा उत्साहात संपन्न !!

Chief Editor

समर्थ पॉलिटेक्निकचा हिवाळी परीक्षेचा निकाल ९८.४७% ;४६ विषयांचा निकाल १००%

Chief Editor

Leave a Comment