सामाजिक

समर्थच्या विद्यार्थ्यांची MHT-CET (PCB) परीक्षेत यशाची सुवर्णझेप !!

1009771846

पंचनामा प्रतिनिधी – ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या जिद्दीला आणि गुणवत्तापूर्ण शिक्षणाला यशाचे पंख लाभल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.समर्थ रूरल एज्युकेशनल इन्स्टिट्यूट संचलित समर्थ ज्युनिअर कॉलेज, बेल्हे -बांगरवाडी येथील विद्यार्थ्यांनी MHT-CET (PCB) २०२६परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन करत संस्थेच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवल्याची माहिती प्राचार्या वैशालीताई आहेर यांनी दिली.

या परीक्षेत रिद्धी थिटे हिने ९७.५४ पर्सेंटाईल गुण मिळवून महाविद्यालयाच्या यशाचा झेंडा उंचावला.तिच्या पाठोपाठ वैष्णवी येवले (९५.८०), दिव्या औटी (९३.५५), आयुष वाघुले (९३.१७), ईश्वरी दाते (९२.३५), श्रुती शिंदे (९२.०७) यांनीही उत्कृष्ट कामगिरी नोंदवली.तसेच श्रुती जोरी, ज्ञानेश्वरी जाधव,प्रतिक्षा गाडेकर, तनुजा औटी, श्रुतिका येवले, चैत्राली साळवे, नेहा हाडवळे, मिनाक्षी लामखडे, इम्रान सय्यद, अनुष्का गाजरे, श्रीराम दांगट, स्नेहल भंडलकर, वेदिका रवळे आदी विद्यार्थ्यांनीही उल्लेखनीय पर्सेंटाईल मिळवत यशाची परंपरा कायम राखली.

ग्रामीण भागातील होतकरू विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण आणि स्पर्धा परीक्षांचे प्रभावी मार्गदर्शन मिळावे यासाठी समर्थ शैक्षणिक संकुल सातत्याने प्रयत्नशील आहे. इयत्ता अकरावीपासूनच विद्यार्थ्यांना MHT-CET परीक्षेची शास्त्रशुद्ध तयारी करून घेतली जाते. नियमित अध्यापन, तज्ज्ञ शिक्षकांचे मार्गदर्शन, विशेष सराव परीक्षा आणि विद्यार्थ्यांची अथक मेहनत यांचा हा यशस्वी संगम असल्याचे प्राचार्या सौ. वैशाली आहेर यांनी सांगितले.
या यशामागे प्रा. संतोष पोटे, प्रा. राजेंद्र नवले, प्रा. विनोद चौधरी, प्रा. अमोल खामकर, प्रा. नूतन पोखरकर, प्रा. रोहिणी औटी, प्रा. सोनल बांगर आणि प्रा. वैशाली ढाकोळ यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.

यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष वसंतराव शेळके, उपाध्यक्ष माउलीशेठ शेळके, सचिव विवेक शेळके, विश्वस्त वल्लभ शेळके, माजी जिल्हा परिषद सदस्या स्नेहलताई शेळके ,कॅम्पस डायरेक्टर राजीव सावंत, तसेच सर्व विभागांचे प्राचार्य, विभागप्रमुख, शिक्षक व कर्मचाऱ्यांनी अभिनंदन करून त्यांच्या पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

ग्रामीण मातीतून उमललेली ही गुणवंत फुले आता वैद्यकीय आणि आरोग्य क्षेत्रातील उज्ज्वल भवितव्याच्या दिशेने आत्मविश्वासाने झेपावत असून समर्थ ज्युनिअर कॉलेजच्या शैक्षणिक गुणवत्तेची साक्ष देत आहेत.

92f4d25e 9686 4a0e aeae dca8fbad0e88 1 all 353520
1009760330
1009760332
1009777264

Related posts

मधमाशीची दृष्टी ठेवा,फुलांची काहीच कमी नाही – मधमाशींच्या पोळयांसाठी मित्रांनो कोणतीच रोजगार हमी नाही !!

Chief Editor

रविवार दि. 4 जानेवारी 2026 रोजी पुनित बालन ग्रुप, फ्री रनर्स ग्रुप पुणे आणि माजी विद्यार्थी विकास प्रबोधिनी लोणी यांच्या संयुक्त विद्यमाने संपन्न होणार लोणी मॅरेथॉन २०२६ !!

Chief Editor

वळती (ता.आंबेगाव) येथे शॉर्ट सर्किटमुळे दोन सख्ख्या भावांचे घर जळून झाले खाक !!

Chief Editor

Leave a Comment