सामाजिक

आंबेगाव तालुक्यातील पूर्व भागात मोबाईल झालेत नॉट रिचेबल;पहाडदरा, शिरदाळे वडगावपीर,मांदळेवाडी ही गाव अनेक वर्षांपासून नेटवर्क पासून वंचित !!

1009774441

पंचनामा प्रतिनिधी – आंबेगाव तालुक्यातील पहाडदरा, शिरदाळे वडगावपीर मांदळेवाडी ही गाव अनेक वर्षांपासून नेटवर्क पासून वंचित आहे.

आंबेगावच्या पूर्व भागातील ही चार गाव असून या गावाची भौगोलिक परिस्थिती डोंगराळ आहे. या भागातील नागरिक गेली कित्येक वर्षे मोबाईलच्या नेटवर्क सेवेपासून वंचित आहे. सदर गावांमध्ये मोबाईल टॉवर उभारावा अशी मागणी पहाडदरा सरपंच मच्छिंद्र वाघ, शिरदाळ्याचे मा उपसरपंच मयुर सरडे वडगावपीर मा. सरपंच संजय पोखरकर, मांदळेवाडी उपसरपंच रवींद्र ढगे पाटील यांनी केली आहे.

92f4d25e 9686 4a0e aeae dca8fbad0e88 1 all 353520

या परिसरात कुठल्याही प्रकारचा मोबाईल टॉवर नसल्यामुळे विद्यार्थी वर्गाचा ऑनलाईन अभ्यास तसेच जि.प.शाळा, ग्रामपंचायत, महसूल, शासकीय कामे नेटवर्क नसल्यामुळे वंचित राहात आहे. त्यामुळे या परिसरातील मुले ऑनलाईन सेवेच्या शोधात वणवण भटकावे लागते.

पहाडदरा, शिरदाळे, गावाच्या बाजूला धामणी गावात मोबाईल टॉवर आहे. वडगावपीर, मांदळेवाडी परिसरात लोणी येथे मोबाईल टॉवर आहे मात्र त्याची रेंज परिसरात उपलब्ध होत नाही.
सध्याचे युग हे डिजिटल युग आहे. भारत सरकारने मेक इन इंडिया, डिजिटल इंडिया सुरू केली मात्र आजही खेडोपाडी ग्रामीण भागात आजूनही मोबाईल टॉवर (नेटवर्क) उभारले गेले नसल्यामुळे विद्यार्थी वर्ग, नोकरवर्ग, शेतकरीवर्ग यांना त्याचा ऑनलाईन सेवेचा लाभ घेता येत नाही.

शेतकरी वर्गासाठी शासनाने आजपर्यंत विविध योजना राबविल्या आहेत. मात्र ग्रामीण भागात नेटवर्क सुविधा उपलब्ध नसल्यामुळे या योजनांचा लाभ घेता येत नाही. अजूनही पीएम किसान सन्मान योजनेचे लाभार्थी शेतकरी वंचित राहात आहेत.

शासनाच्या विविध योजना या ऑनलाइन पद्धतीच्या असल्याने नेटवर्क व्हावी या परिसरातील शेतकरी वंचित राहत आहे महसूल विभागाकडून ई पीक पाहणी थेट शेतातून करावी लागत आहे या परिसरात कधी दुष्काळ तर कधी अतिवृष्टी गारपीट होते नेटवर्क नसल्याने शेतकऱ्यांच्या सातबारा उतारावर ऑनलाइन नोंद होत नसल्याने या परिसरातील शेतकरी शासकीय मदती पासून वंचित राहत आहे असे शिरदाळे गावचे मा. उपसरपंच मयुर सरडे यांनी पंचनामाशी बोलताना सांगितले.

1009760330
1009760332

Related posts

समर्थ फार्मसी,बेल्हे मध्ये राज्यस्तरीय प्रश्नमंजुषा उत्साहात संपन्न !!

Chief Editor

पद्मश्री मा.रघुवीर खेडकर यांच्या तमाशा रंगमंचावरील पहिल्या एन्ट्रीचा किस्सा !!

Chief Editor

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गवारीमळा (मेंगडेवाडी) येथे उत्साहात संपन्न झाला मातृ पितृ पूजन दिवस!!

Chief Editor

Leave a Comment