सामाजिक

अरुण खरात यांना पद्मभूषण पत्रकार बाळासाहेब भारदे पुरस्कार जाहीर !!

img 20260322 wa0399

पंचनामा प्रतिनिधी – कोपरगाव तालुक्यातील चांदेकसारे येथील सामाजिक कार्यकर्ते अरुण खरात यांना पुणे येथील काव्यात्मा साहित्य परिषद यांचे वतीने राज्यस्तरीय पद्मभूषण बाळासाहेब भारदे पुरस्कार जाहीर झाला आहे. सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल अरुण खरात यांना काव्यात्मा साहित्य परिषदेचे अध्यक्ष आत्माराम हारे यांनी हा पुरस्कार जाहीर केला आहे येत्या रविवारी पुण्यात हा पुरस्कार वितरण सोहळा मान्यवरांच्या उपस्थितीत होणार असून यावेळी निमंत्रितांचे कवी संमेलनाचेही आयोजन करण्यात आले आहे.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कवयित्री प्रतिमा काळे या करणार आहेत तर प्रमुख अतिथी म्हणून प्रसिद्ध निवेदक श्रीकांत चौगुले, पुरुषोत्तम सदाफुले तर वृक्षमित्र अरुण पवार उपस्थित राहणार आहेत.

fb img 1773887068819

राजकारण, समाजकारण, अध्यात्म, सहकार,पत्रकारिता अशा सर्व क्षेत्रात आपल्या नावाचा ठसा उमटवणारे बाळासाहेब भारदे यांच्या नावाने मला पुरस्कार मिळणे ही गोष्ट माझ्यासाठी अभिमानाची व आनंदाची आहे अशी भावना अरुण खरात यांनी व्यक्त केली.

अरुण खरात यांना पुरस्कार जाहीर होताच त्यांचे सर्वच स्तरातून अभिनंदन होत आहे.

Related posts

समर्थ क्रीडा संकुलात जुन्नर तालुकास्तरीय शालेय क्रिकेट स्पर्धा उत्साहात ;४० शाळांतील मुला-मुलींच्या संघांचा सहभाग !!

Chief Editor

वाणिज्य विभागाअंतर्गत तृतीय वर्ष वाणिज्य वर्गाचा इंटरशिप प्रोग्राम समारोप संपन्न !!

Chief Editor

विठुरायाच्या पंढरीच्या सेवेचे वारकरी : राजेंद्र शेळके

Chief Editor

Leave a Comment