सामाजिक

शिरदाळे (ता.आंबेगाव) येथील जेष्ठ आणि तरुणांच्या श्रमदानातून वटवृक्षाला बनवला ओटा !!

img 20260322 wa0585
img 20260322 wa0585

एकीच्या बळातून वटवृक्षाच्या झाडाला ओटा बनवण्याचे काम नेले एका दिवसात पूर्णत्वास !!

पंचनामा प्रतिनिधी – शिरदाळे (ता.आंबेगाव) येथील तळ्याच्या कडेला दोन ते तीन वर्षांपूर्वी एक वडाचे झाड लावण्यात आले होते.गेल्या तीन वर्षात त्याला गावातील तरुणांनी चांगल्याप्रकारे पाणी देऊन जगवले आहे.झाडाने चांगल्या प्रकारे उंची आणि फांद्या बहरलेल्या आहेत.अनेक दिवस ग्रामस्थांची त्याला ओटा बनवण्याची इच्छा होती.कारण आता उन्हाळा असल्याने त्याची चांगली सावली सर्वांना मिळणार आहे.आज दुपारी सहजच हा ओटा करण्याचा विषय जेष्ठ मंडळींसमोर मांडला.त्यांनी देखील लगेच त्याला सकारात्मक प्रतिसाद देत कामाला सुरवात केली.

img 20260322 wa0571

सुरवातीला चार पाच जण असणारे ग्रामस्थ हळूहळू वाढत गेले.तब्बल पंधरा ते वीस ग्रामस्थ जमा झाले.पाहता पाहता संपूर्ण ओटा सायंकाळी सहा पर्यंत पूर्ण दगड मातीच्या सहाय्याने बांधन पद्धतीमध्ये सर्व जुन्या मंडळींनी बांधून काढला.अंदाजे तीस बाय पंधरा फूट लांबीचा हा ओटा भविष्यात गावची शान वाढवणारा आहे.कारण गावच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या विरुद्ध दिशेला असल्याने तळ्याच्या अगदी जवळ असल्याने अगदी शुद्ध हवा त्यातून मिळणार आहे.आता एक दिवस त्यात माती आणि मुरूम भरण्याचे काम बाकी आहे.ते पूर्ण झाल्यानंतर मात्र झाडाच्या सावलीचा आनंद अगदी सर्वांना त्याखाली बसून घेता येणार आहे.

या स्तुत्य उपक्रमात खास करून गावातील जेष्ठ मंडळींचा सहभाग मोठा होता.कारण हेच काम करण्यासाठी कारागीर मंडळींनी हजारो रुपये घेतले असते.परंतु सर्वांच्या एकत्रित श्रमदानाने मात्र आज हे सुंदर काम पूर्णत्वास गेले.यात विशेष कष्ट घेतले ते श्री.सखाराम लक्ष्मण तांबे (वय ८० वर्ष),श्री.शांताराम चौधरी(वय ८० वर्ष),श्री.रामचंद्र रणपिसे(वय ८० वर्ष),श्री.देवराम रणपिसे(वय ७५) ,श्री.संजय तांबे,श्री.मयुर सरडे,श्री.कल्पेश सरडे,श्री.रंगनाथ रणपिसे (वय ७० वर्ष),श्री.बाळासाहेब चौधरी (वय ७५ वर्ष) यांनी सुरवातीपासून शेवटपर्यंत या श्रमदानातू मदत केली.तर श्री.बबन हरिभाऊ रणपिसे,श्री.केरभाऊ तांबे,श्री.कोंडीभाऊ तांबे,श्री.दिनकर तांबे,श्री.दिनकर तांबे,श्री.शिवाजी सरडे यांनी देखील या श्रमदानात मोलाचे सहकार्य केले.

img 20260322 wa0573

हे काम करताना एक वेगळं समाधान सर्वांना मिळाले.शिवाय उद्यापासून सर्वांना वडाच्या झाडाच्या सावलीला बसण्याचा आनंद मिळणार आहे.या स्तुत्य उपक्रमामुळे या जेष्ठ व्यक्तिमत्वाचे ग्रामस्थांनी कौतुक केले.

img 20260322 wa0577
img 20260322 wa0579
fb img 1773887073740

Related posts

भैरवनाथ विद्याधाम लोणी (धामणी) येथे शुक्रवार दि.२६ डिसेंबर २०२५ ते मंगळवार ३० डिसेंबर २०२५ पर्यंत संपन्न होणार विविध शालेय उपक्रम!!

Chief Editor

जवळे (ता.आंबेगाव) येथे संपन्न झाली स्वच्छता मोहीम!!

Chief Editor

जुनं ते सोनं ;आमच्या शिरदाळे गावातील धोतर टोपी,नेहरू-पायजमा मधील ही कदाचीत शेवटची पिढी असेल ….!!!

Chief Editor

Leave a Comment