सामाजिक

आंबेगाव तालुक्यातील रानमळ्यात बिबट्या वावर ? वनविभागाचे दुर्लक्ष !!

1009723031

पंचनामा प्रतिनिधी – रानमळा (ता. आंबेगाव ) येथे गेली कित्येक दिवस बिबट्याचा वावर वाढल्याने परिसरात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.

लोणी रानमळा रस्त्यावर तर बिबट्या दिसणे नित्याचेच झाले आहे. मध्यंतरी याच मार्गावर बिबट्याने दुचाकी चालकावर हल्ले केल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.सध्या तर रानमळा लोणी रस्त्यावर बिबटया ऐटीत रस्ता ओलांडत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

बिबट्याचा वावर वाढल्याने वनविभागे येथे दोन पिंजरे बसविले असून अजून एक पिंजरा लोणी राममळा येथील ओढ्याच्या उजव्या बाजूस बसवावा अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

92f4d25e 9686 4a0e aeae dca8fbad0e88 1 all 353520

या परिसरात बिबट्याने दोन दिवसापूर्वी येथील जूना बैल गाडा घाटाजवळ रात्रीच्या वेळी भिमा जिते यांच्या घराजवळ घोडीच्या पिलावर-शिंगरू वर हल्ला करून जखमी केले. बिबटयाचा वावर वाढल्याने सध्या शेतीची कामे ठप्प झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. तेव्हा वनविभागाने तात्काळ पाऊले उचलून बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी सरपंच राजू सिनलकर यांनी केली आहे.बिबटचा दिसला तर त्वरीत वनविभागला कळविण्याचे आवाहन वनविभागाने केले आहे. असे असले तरी एखादी मोठी घटना घडण्याची वाट वनविभागाने पाहू नये अशी चर्चा ग्रामस्थ करत आहेत.

1009760330
1009760332

Related posts

सागदरा सहकारी उपसा जलसिंचन योजनेच्या चेअरमनपदीसोमनाथ शंकर जाधव पाटील तर व्हाइस चेअरमनपदी भानुदास महादू जाधव पाटील यांची बिनविरोध निवड!!

Chief Editor

आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागात दुष्काळ जाणवायला लागला!!

Chief Editor

अन् अजितदादा पवार तमाशा कलावंत शांताबाई ला नम्रपणे नमस्कार करतात !!

Chief Editor

Leave a Comment