सामाजिक

काठापूर बुद्रुकमध्ये श्रावणी बैलपोळ्याचा उत्साह ; बैलांची गावातून मिरवणूक; महिलांकडून औक्षण करून पुरणपोळीचा नैवेद्य !!

1010907319
1010907319

पंचनामा प्रतिनिधी – आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागातील काठापूर बुद्रुक येथे श्रावणी बैलपोळा सण मोठ्या उत्साहात व पारंपरिक पद्धतीने साजरा करण्यात आला. यानिमित्त शेतकऱ्यांनी आपल्या बैलांना सजवून त्यांची गावातून मिरवणूक काढली. या मिरवणुकीमुळे गावातील वातावरण उत्साहमय झाले होते.

बैलपोळ्यानिमित्त महिलांनी सजवलेल्या बैलांचे औक्षण करून त्यांची विधिवत पूजा केली. तसेच बैलांना पुरणपोळीचा नैवेद्य भरवून शेतकरी कुटुंबांनी कृतज्ञता व्यक्त केली. शेतीच्या कामात वर्षभर शेतकऱ्याला साथ देणाऱ्या बैलांप्रती आदर आणि ऋण व्यक्त करण्याची ग्रामीण भागातील ही पारंपरिक प्रथा आजही मोठ्या श्रद्धेने जपली जात आहे.

दरम्यान, शेतीमध्ये मोठ्या प्रमाणात आधुनिकीकरण झाल्यामुळे ट्रॅक्टर व आधुनिक यंत्रसामग्रीचा वापर वाढला असून शेतीच्या कामासाठी बैलांचा वापर पूर्वीच्या तुलनेत कमी झाला आहे. त्यामुळे गावोगावी बैलांची संख्या लक्षणीयरीत्या घटली आहे. मात्र, ग्रामीण भागात बैलगाडा शर्यतीचा छंद मोठ्या प्रमाणात जोपासला जात असल्याने अनेक शेतकरी आजही बैलांचे संगोपन आवडीने करीत आहेत.

1010891586
बैलपोळ्याच्या निमित्ताने शेतकऱ्यांनी आपल्या लाडक्या बैलांना सजवून मिरवणुकीत सहभागी केले. पारंपरिक वेशभूषा, सजवलेले बैल आणि महिलांकडून करण्यात आलेले औक्षण यामुळे काठापूर बुद्रुक येथे श्रावणी बैलपोळा सणाचा उत्साह पाहायला मिळाला.
file 000000003e9c821182ea0c832397afbf
92f4d25e 9686 4a0e aeae dca8fbad0e88 1 all 378997
1010908108

Related posts

प्रकाश सापळ्यांद्वारे करा हुमणी किडीचे प्रभावी नियंत्रण !!

Chief Editor

अशी कला असे कलावंत – हार्मोनियम मास्टर विठ्ठल भोसले

Chief Editor

गुड न्यूज – मान्सून पुन्हा सक्रिय होणार; २५ जूनपासून संपूर्ण महाराष्ट्रात दमदार पावसाची शक्यता;शेतकऱ्यांना पेरणीची घाई न करण्याचा सल्ला !!

Chief Editor

Leave a Comment