सामाजिक

पारगाव (शिंगवे ) येथे श्रावणी सोमवारनिमित्त भाविकांना फराळाचे वाटप !!

1010855785

पोलीस उपनिरीक्षक सचिन कांडगे यांनी घेतले पारेश्वराचे दर्शन; भाविकांना दिल्या शुभेच्छा

पंचनामा प्रतिनिधी पारगाव – पवित्र श्रावण महिन्यातील चौथ्या सोमवारनिमित्त पारगाव येथील पारेश्वर मंदिरात भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती. यावेळी पारगाव कारखाना पोलिस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक सचिन कांडगे यांनी पारेश्वराचे दर्शन घेऊन उपस्थित भाविकांना चौथ्या सोमवारच्या शुभेच्छा दिल्या.

चौथ्या सोमवारनिमित्त पारगाव ग्रामस्थांच्या वतीने भाविकांसाठी खिचडीचे आयोजन करण्यात आले होते. तसेच भाविकांना खिचडी, केळी, चिक्की तसेच राजगिरा लाडू आदी फराळाचे वाटप करण्यात आले. या उपक्रमाची माहिती किरण कोल्हे सर यांनी दिली.

1010855781

यावेळी पारगाव कारखाना पोलिस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक सचिन कांडगे, माजी उपसरपंच विठ्ठल ढोबळे, पारगाव पोलिस हेड कॉन्स्टेबल संजय साळवे, रोहिदास लोंढे, शंकर देवडे, रंगनाथ चव्हाण, सचिन ढोबळे, साईनाथ गायकवाड, मुख्याध्यापक संतोष लबडे सर, पारेश्वर मंदिराचे पुजारी गणेश बारवे, संतोष ढोबळे, विवेक चव्हाण, गणेश चव्हाण, सुहास मिंडे आदी मान्यवर उपस्थित होते.

चौथ्या सोमवारनिमित्त मंदिर परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते. ग्रामस्थांनी केलेल्या फराळ व खिचडी वाटपाच्या उपक्रमास भाविकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

92f4d25e 9686 4a0e aeae dca8fbad0e88 1 all 378997

Related posts

विद्यार्थ्यांच्या नवकल्पनांचा बेल्ह्यात ‘आविष्कार’; पुणे-मुंबई विभागीय फेरीसाठी समर्थ इन्स्टिट्यूट सज्ज !!

Chief Editor

मागील पाच वर्षांत टँकरद्वारे पाणीपुरवठा झालेल्या गावांचा जलयुक्त शिवार ३.० मध्ये प्राधान्य मिळणार- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Chief Editor

पारगाव (शिंगवे) ग्रामपंचायतीकडून अंगणवाडीतील विद्यार्थ्यांना दप्तर व ड्रेस वाटप !!

Chief Editor

Leave a Comment