सामाजिक

जागतिक महिला दिनानिमित्ताने लोणी (धामणी) ग्रामपंचायतीकडून महिला शक्तीचा सन्मान !!

img 20260308 143316

पंचनामा प्रतिनिधी लोणी (ता.आंबेगाव) – महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी आणि वैयक्तिक प्रगतीला चालना देण्यासाठी जागतिक महिला दिनानिमित्त ग्रामपंचायत लोणीच्या वतीने विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी गावातील विविध क्षेत्रांत कार्यरत असलेल्या महिलांचा आणि बचत गटांच्या प्रतिनिधींचा यथोचित सन्मान करण्यात आला.

कार्यक्रमाची ठळक वैशिष्ट्ये:
बचत गटांचे सक्षमीकरण: महिलांनी एकत्रित येऊन आर्थिक स्वावलंबन कसे मिळवावे, यावर भर देण्यात आला.

वैयक्तिक प्रगती: केवळ घर आणि कुटुंबच नव्हे, तर महिलांनी स्वतःच्या आवडीनिवडी आणि कौशल्यांचा विकास करावा, असे आवाहन यावेळी करण्यात आले.

img 20260308 143350

या सोहळ्याला गावाचे सरपंच डॉ. श्री सावळेराम आबाजी नाईक व उपसरपंच श्री. राजेंद्र वामन वाळूंज आणि ग्रामपंचायत सदस्य कर्मचारी उपस्थित होते.

“महिला ही कुटुंबाचा कणा आहे. जेव्हा एखादी महिला आर्थिकदृष्ट्या सक्षम होते, तेव्हा संपूर्ण गाव प्रगती करतो. लोणी गावातील प्रत्येक भगिनीला प्रगतीची संधी मिळावी, हाच आमचा मानस आहे असे प्रतिपादन सरपंच नाईक यांनी केले आहे.

fb img 1771121541695

Related posts

समर्थ शैक्षणिक संकुलात ‘PHARMA AI-NOVA 2026’ राष्ट्रीय परिषद उत्साहात !!

Chief Editor

शाळेप्रती कृतज्ञता व्यक्त करीत भारतीय नौदलातील कॅप्टन तन्मय अशोक सैद पाटील यांचे शाळेला क्रीडा साहित्यासाठी ५० हजारांचे सौजन्य !!

Chief Editor

श्री भैरवनाथ पतसंस्थेची ३७ वी वार्षिक सर्वसाधारण सभा उद्या शनिवार दिनांक २९ ऑगस्ट २०२६ रोजी होणार संपन्न !!

Chief Editor

Leave a Comment