

पंचनामा प्रतिनिधी -समीर गोरडे
पुस्तकी ज्ञानासोबतच विद्यार्थ्यांना व्यावहारिक कौशल्य आणि आत्मविश्वास मिळावा, या उद्देशाने पारगाव जिल्हा परिषद शाळेत आयोजित ‘बाल आनंद मेळाव्याला’ ग्रामस्थ व पालकांचा उदंड प्रतिसाद लाभला. या मेळाव्यात विद्यार्थ्यांनी लावलेल्या ७२ स्टॉल्समधून तब्बल १लाख १० हजार रुपयांची विक्रमी खरेदी-विक्री झाल्याची, माहिती मुख्याध्यापक नवनाथ सिनलकर यांनी दिली.

विद्यार्थ्यांनी स्वतः व्यवस्थापन करत दुकाणे लावून मेथी, कोथिंबीर, शेवगा, वांगी, पालक यांसारख्या ताज्या पालेभाज्यांसह ओली भेळ, वडापाव, सँडविच, पावभाजी, इडली, मंचूरियन, गुलाबजाम आणि पाणीपुरी अशा विविध खाद्यपदार्थांचे स्टॉल लावण्यात आले होते. केवळ विक्रीच नाही, तर
ग्राहकांना आकर्षित करणे, मालाचा हिशोब ठेवणे आणि चिल्लर पैशांचे नियोजन करणे यातही विद्यार्थ्यांनी कसब दाखवले.

गटशिक्षणाधिकारी रुपाली धोका,शिक्षण विभाग पंचायत समिती आंबेगाव यांचे प्रेरणेतून,शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली मुलांनी हे सर्व नियोजन पार पाडल्याचे जालिंदर पोंदे यांनी सांगितले.
या मेळाव्याला पंचायत समिती सदस्या श्वेता ढोबळे, पंचायत समिती सदस्या अंकीता वाळुंज, भिमाशंकर सहकारी साखर कारखाना संचालक नितिन वाव्हळ,पोलीस पाटील गणेश पंडित,केंद्रप्रमुख राजू जाधव,संचालक हनुमंत तागड,पीडीसी दत्तात्रय गाढवे, चेअरमन दत्ता गोरडे,उपसरपंच हिरामण गोरडे,संतोष वाव्हळ, मा.उपसरपंच सुनंदा ढोबळे,ग्रामपंचायत सदस्य,शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष समीर गोरडे, उपाध्यक्षा रेखा पाबळे, सदस्य वैजनाथ येंथे, महेश बांगर,गोरक्ष जगताप, योगेश कासार आदी मान्यवर व ग्रामस्थांनी भेट देऊन विद्यार्थ्यांच्या उपक्रमाचे कौतुक केले.

कार्यक्रमाचे यशस्वी नियोजन जालिंदर पोंदे,श्रीकृष्ण डुकरे,विलास भोर,अशोक लोखंडे,सुभाष इंदोरे,वैजयंती लोखंडे,संगीता इंदोरे,चित्रा पंडित,वर्षा लोंढे या शिक्षकांनी केले.


